दशक्रिया विधीसाठी आदिवासींची पायपीट

दशक्रिया विधीसाठी आदिवासींची पायपीट

खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांना मूलभूत हक्कासाठी झगडावे लागत आहे. जिवंतपणी अनेक यातना भोगणाऱ्या या समाजाला मरणानंतरही अवहेलना सहन करावी लागते. चौक परिसरातील आदिवासी समाजबांधवांना दशक्रिया विधी करण्यासाठी पाच किलोमीटरची पायपीट करून नदीकिनारा गाठावा लागतो. वावोशीतील आदिवासी बांधव जांभिवली येथील नदीकिनारी धार्मिक विधीसाठी येतात. मात्र या ठिकाणी समाज मंदिर नसल्याने ऊन, वारा, पाऊस याचा सामना करत त्यांना धार्मिक विधी पार पाडावी लागतात. गेल्या दोन वर्षांपासून समाज मंदिर बांधण्याकडे मिंधे सरकारने लक्ष न दिल्यामुळे आदिवासी बांधवांची ससेहोलपट होत आहे.

वावोशी परिसरातील आदिवासी बांधव हे जांभिवली (छत्तीशी विभाग) येथील साईबाबा मंदिराजवळील नदीवर धार्मिक विधी पार पाडत असतात. आदिवासी बांधव हे दशक्रिया विधी नेहमीच नदीकाठी करत असतात. दशक्रिया विधी नदीकाठी करण्याची त्यांची जुनी परंपरा आहे. मात्र नदी-नाले हे जानेवारीनंतर जूनपर्यंत कोरडे पडलेले असतात. त्यामुळे या लोकांना आपल्या घरापासून पाच किलोमीटर असलेल्या नदीवर जाऊन त्यांना विधी करावा लागतो. त्यामुळे येथील लोक वावोशी फाटा येथील जांभिवली गावातून येणाऱ्या नदीकाठी असलेल्या कातळावर हा धार्मिक विधी पूर्ण करत असतात. मात्र हा धार्मिक विधी पूर्ण करत असताना ऊन, वारा, पावसाचा व्यत्यय येत असतो. त्यामुळे हे विधी करताना अडचणी येत असतात. या अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी बांधवांना या ठिकाणी समाज मंदिर सभागृह बांधून मिळावे अशी मागणी आदिवासी बांधवांची आहे.

कर्जाचा बोजा
आदिवासी समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे. समाजात दशक्रिया विधी करणे क्रमप्राप्त असल्याने कर्ज किंवा उसनवारी करून विधी पूर्ण करावा लागतो. जांभिवली येथील साईबाबा मंदिराजवळ धार्मिक विधीसाठी समाज मंदिर सभागृह बांधून मिळावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य राम वाघमारे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिटमॅनच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन, रोहित आणि रितीका यांना पुत्ररत्नाचा लाभ हिटमॅनच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन, रोहित आणि रितीका यांना पुत्ररत्नाचा लाभ
टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबईचा वंडर बॉय रोहित शर्माच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रोहित शर्मा आणि त्याची पत्नी...
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं होतं ‘वन नाईट स्टँड’; न बोलवताच पार्टीत पोहोचली दारू पेऊन बेशुद्ध, नशेतच दिला लग्नाला होकार
माझ्या अंगात प्राण आहे तोपर्यंत महाराष्ट्र लुटायला देणार नाही, उद्धव ठाकरे गरजले
Champions Trophy – ICC ने पाकिस्तानला ठणकावले, PoK मध्ये ट्रॉफी नेण्यास मनाई
मुख्यमंत्री कपड्याने योगी आहेत, विचारांनी नाही; अखिलेश यादव यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका
अमेरिकेत दरवर्षी किती लोकांना मिळतं ग्रीन कार्ड? यात हिंदुस्थानी नागरिकांची किती आहे संख्या? जाणून घ्या
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले?