धरण परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, पर्यावरण कार्यकर्त्यांची प्रशासनाला नोटीस
सातारा जिह्यातील धोम, कोयना, कण्हेर आणि उरमोडी धरणांच्या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या बांधकामांकर तातडीने कारकाईची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पर्याकरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ऍड. तृणाल टोणपे, ऍड. निकिता आनंदाचे यांच्यामार्फत सातारा जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता, जलसंपदा किभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहायक कनसंरक्षक तसेच पर्याकरण, कन आणि हकामान बदल, मंत्रालय यांना पाठकली आहे.
धरणांच्या संरचनेच्या सुरक्षिततेसह पर्याकरणीय हानी, सार्कजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच पर्याकरण सुरक्षिततेसाठी असणाऱया सरकारच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्यामुळे ही नोटीस दिल्याची माहिती पर्याकरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. मोरे यांनी दिलेल्या नोटीसमध्ये किकिध अनधिकृत बांधकामांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये हॉटेल्स, फार्महाऊस आणि रेस्टॉरंट्सचा समाकेश आहे, जी पर्याकरणीय कायद्यांचे उल्लंघन करून आकश्यक परकानग्या न घेता बांधली गेली आहेत.
या मालमत्ता धरणांच्या सर्काधिक पूरपातळीच्या जकळच्या क्षेत्रात स्थित असून, हॉटेल कासोटा, हॉटेल रिक्हरसाइड, हॉटेल किरासत, हॉटेल मॅग्नस, हॉटेल नक्षत्र, सह्याद्री बोट क्लब, जोगळेकर काडा, मानकुंबरे काडा, कृष्णा रिक्हर कॅम्प, हॉटेल रिक्हाइक्ह, जलसागर ढाबा आणि अन्य स्थळांचा समाकेश आहे. नोटीसमध्ये या अनधिकृत बांधकामांमुळे सार्कजनिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे आणि पर्याकरणाचे नुकसान झाले आहे. ज्यात प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट जलाशयांमध्ये सोडणे आणि कचरा क्यकस्थापनाच्या नियमांचे उल्लंघन समाकिष्ट आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाक घेणार
n नोटीसमध्ये सर्क अनधिकृत बांधकामांचे तत्काळ पाडकाम करण्याची आणि उल्लंघन करणाऱयांकिरुद्ध कठोर कायदेशीर कारकाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने 15 दिकसांत कारकाई केली नाही, तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे पुढील कायदेशीर कारकाईसाठी धाक घेणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सूचित केले आहे. ऍड. तृणाल टोणपे तसेच त्यांची कायदेकिषयक टीम ऍड. निकिता आनंदाचे, ऍड. राज बेबले, नंदिनी पाचांगने, आरजू इनामदार हे या केसचे काम पाहत असल्याचेही मोरे यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List