शिकवू नको, अती शहाणी; फरसाण खाण्यावरूनही ट्रोल, प्राजक्ता माळीवर नेटकरी का संतापले?
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या ‘फुलवंती’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. फुलवंतीमधील तिच्या पेहरावापासून ते तिच्या नृत्यापर्यंत, तिच्या अभिनयाचं सर्वजण कौतुक करत आहेत. प्राजक्ता माळीचे जेवढे कौतुक होते तशी ती कित्येकदा तिच्या वक्तव्यावरून ट्रोलही होते. प्राजक्ता माळीचे फुलवंतीसाठी एवढे कौतुक होत असताना त्याच चित्रपटानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती ट्रोल झाली आहे.
‘ऑरा’ जपण्यासाठी प्राजक्ताने सांगितल्या काही पद्धती
प्राजक्ता तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटानिमित्ताने प्राजक्ता माळी विविध ठिकाणी मुलाखती देताना पाहायला मिळत आहे. एका मुलाखतीमध्ये तिने ऑरा जपण्यासाठी काय करते? याविषयी सांगितलं होतं. त्यावरून नेटकरी प्राजक्ता माळीला ट्रोल करत आहेत. प्राजक्ता योग, ध्यान हे सर्व नेहमीच करत असते. कित्येकदा ती याबद्दल बोलली आहे. एका मुलाखती दरम्यान तिला ऑरा जपण्यासाठी काय करते असे विचारले असता तिने काही पद्धती सांगितल्या यावरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
प्राजक्ता म्हणाली “मी नेहमी बाहेरून खूप माणसांमधून घरी गेले तर मिठाच्या पाण्यानेच अंघोळ करते. सातत्याने थोडे थोडे केस कापत राहते. कारण तुमची सर्वात जास्त मेमरी किंवा ती एनर्जी असते ती केसांमध्ये असते. आर्ट ऑफ लिव्हिंगमुळेच मला हे कळलंय की, जेव्हा डाव्या नाकाची नाकपुडी उघडी असते तेव्हा ध्यानाला बसा, पाणी प्या. मला या छोट्या छोट्या गोष्टींचा पण खूप फायदा होतो. त्यामुळे लोकांमध्ये बाहेर फिरताना पोट बिघडत नाही.”
पुढे प्राजक्ता म्हणाली की, “एकावेळेला तुम्ही चारच पदार्थ खा. म्हणजे पोटात मारामारी होतं नाही. चार पेक्षा अधिक पदार्थ असेल तर मग गडबड होते. यामुळे मी कितीही प्रवास केला तर माझी सिस्टिम जाग राहायला मदत होते. ते शिकल्यामुळे बाहेर वावरताना त्रास होतो. पण ते शिकल्यामुळे असं वावरणं सुसह्य देखील होतं. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
नेटकऱ्यांकडून प्राजक्ताच्या वक्तव्याची खिल्ली
‘शेतकरी हे सर्व करू शकतो?, ‘किती ते ओव्हर करायचं सगळं? फालतूपणा’, ‘भर्मिष्ट आहे ही’, ‘अती शहाणी आहे’, ‘स्वतःला मिस वर्ल्ड समजते का ?’, “ओव्हर अॅक्टिंगचे दुकान’, ‘जास्त नको शिकवू’, ‘सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा’, अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. उमटल्या आहेत. तसेच एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, की ,’मेमरी हाडं आणि केसांमध्ये असते हे मला २५ वर्ष सायन्स शिकल्यावर आज समजलं’.
तर अजून एका नेटकऱ्यांने थेट तिच्या फरसाण खाण्यावरच निशाणा साधला आणि म्हणाला, ‘आधी फरसाण खायचं बंद कर’. नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगवर प्राजक्ता माळीने अद्याप तरी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘फुलवंती’ च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल
अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘फुलवंती या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तसेच ‘फुलवंती’ चित्रपटाबद्दलही ती भरभरून बोलताना दिसते. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन, असा विश्वास असल्याचेही ती म्हणाली. दरम्यान ‘फुलवंती’ चित्रपटात प्राजक्तासह अभिनेता गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत झळकला आहे. तसंच प्रसाद ओक, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, क्षितीज दाते, हृषिकेश जोशी, सुखदा खांडकेकर, जयवंत वाडकर, सविता मालपेकर, दीप्ती लेले, सुनिल अभ्यंकर, निखिल राऊत असे अनेक तगडे कलाकार मंडळी ‘फुलवंती’ चित्रपटात झळकले आहेत. प्रवीण तरडेंच्या पत्नी स्नेहल तरडेने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List