‘नागिन’ची कोट्यवधींची कमाई कशी होते? 40% सोशल मीडिया, 20% चित्रपट अन्..
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय आता चित्रपटांमध्ये सक्रिय झाली आहे. 'क्योंकी सास भी कभी बहु थी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर 'नागिन' या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौनीने तिच्या कमाईविषयी खुलासा केला. मौनी चित्रपटांमध्ये जरी काम करत असली तरी त्यातून फारशी कमाई होत नसल्याचं तिने सांगितलं आहे.
चित्रपटांपेक्षा जास्त कमाई माझी जाहिराती आणि सोशल मीडियाद्वारे होते. मी बऱ्याच रेस्टॉरंटमध्येही गुंतवणूक केली आहे. खरं सांगायचं झालं तर माझी 40 टक्के कमाई ही सोशल मीडियातून होते. तर 20 टक्के कमाई चित्रपटांमधून आणि 40 टक्के कमाई जाहिरातींमधून होते", असं मौनी म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List