Diwali 2024: बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय दिवाळी अधुरी, 5 वं गाणं आजही सर्वांचं फेव्हरेट

Diwali 2024: बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय  दिवाळी अधुरी,  5 वं गाणं आजही सर्वांचं फेव्हरेट

Diwali 2024: देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर घरांच्या भिंती दिव्यांनी उजळून निघाल्या असून मिठाईच्या गोडव्याबरोबरच लहान मुलंच नाही तर, प्रत्येक जण फटाके फोडण्यास उत्सुक आहेत. पण बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय प्रत्येक सण अधुरा आहे. बॉलिवूडने प्रेक्षकांना अशी काही गाणी दिली आहे त, त्यामुळे दिवाळीची रंगत आणखी वाढवणार आहेत. तर आजच्या मुहूर्तावर दिवाळीचे काही खास आणि गाजलेली गाणी ऐकू…

‘दीप दिवाली के झूठे’ – 1960 साली प्रदर्शित झालेल्या ‘‘जुगनू’’ सिनेमात एक दिवाळीचं गाणं आहे. दिग्गज गायक मोहम्मद रफी यांनी गायलेले, हे गाणे दिवाळीच्या सणाचं सार सुंदरपणे कॅप्चर करतं. ‘दीप दिवाली के झूठे’ असं गाण्याचं नाव आहे.

‘एक वो भी दिवाली थी’ – हे गाणं 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नजराना’ सिनेमातील आहे. मुकेश यांनी गायलेल्या या गाण्याचे बोल राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले असून संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांनी गाणं संगीतबद्ध केलं आहे. राज कपूर, वैजयंती माला, उषा किरण, जेमिनी गणेशन आणि आघा यांसारख्या दिग्गज कलाकारांवर गाणं चित्रित करण्यात आलं.

‘चिरागों के रंगीन दिवाली’ – गाण साम्रादनी लता मंगेशकर याचं क्लासिक ट्रॅक देखील ‘नजराना’ सिनेमातील आहे.

‘आई है दिवाली’ – 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमदानी अथन्नी खर्चा रुपैया सिनेमातील हे गाणं आजही प्रचंड गाजतं. उदित नारायण, अलका याज्ञिक, कुमार सानू, शान, केतकी दवे आणि स्नेहा पंत यांनी गायले आहे.

‘मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली’ – हे गाणं आजही प्रचंड गाजत आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘होम डिलिव्हरी: आपको…घर तक’ सिनेमातील हे गाणं आहे. . वैशाली, सुरथी, दिव्या, सूरज आणि सुनिधी चौहान यांनी गायलेल्या या गाण्याचे बोल विशाल ददलानी यांनी लिहिले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भावगंधर्व जागवणार ‘विश्वमोहिनी’ लतादीदींच्या हृद्य आठवणी, 29 नोव्हेंबरला विलेपार्ले येथे कार्यक्रम भावगंधर्व जागवणार ‘विश्वमोहिनी’ लतादीदींच्या हृद्य आठवणी, 29 नोव्हेंबरला विलेपार्ले येथे कार्यक्रम
भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर सध्या लतादीदींवर एक पुस्तक लिहीत आहेत. या पार्श्वभूमीवर लतादीदींच्या सांगीतिक कार्याचा आणि त्याअनुषंगाने येणाऱया खूप वेगळ्या,...
धक्कादायक! ट्रम्प यांच्या विजयानंतर महिलेने कुऱ्हाडीने वार करत वडिलांचीच केली हत्या
अनिल कपूरचा भाऊ संजय कपूरला ही चूक पडली महागात, बॉलिवूड करिअरवर परिणाम
मुकेश खन्ना यांनी टायगर श्रॉफची उडवली खिल्ली, म्हणाले तो शक्तीमानच्या लायकीचा…
सेटवर करायची सफाईचं काम; अनेकदा रिजेक्ट झाली, अभिनेत्रीने दिले एकाच वर्षात 8 हिट चित्रपट, शाहरुखची फिल्म नाकारली
कपिल शर्माच्या शोला कॉमेडी नडली, थेट कायदेशीर नोटीस; सलमान खानच्या टीमने केले हात वर म्हाणाले,” आमचा काय संबंध….”
जया बच्चन रेखा यांना असं काय म्हणाल्या होत्या की, त्या अमिताभ यांच्या जीवनातून निघून गेल्या