विधानसभा निवडणुकीत इतक्या जागांवर कमळ फुलणार; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला , दिवाळीपूर्वीच उडवला बार

विधानसभा निवडणुकीत इतक्या जागांवर कमळ फुलणार; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला , दिवाळीपूर्वीच उडवला बार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. लढाई आता हातघाईवर आली आहे. अनेक मतदारसंघात जागा वाटपानंतर पेच निर्माण झाला आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीने महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. जागा वाटपावरील खलबतं अजूनही संपलेली नाही. नाराजांची नाराजी दूर करण्याचे आणि बंडोबांना थंड करण्याचे काम करण्यात येत आहे. दरम्यान भाजपच्या या बड्या नेत्याने विधानसभेत किती आमदार निवडून येणार याचा आकडाच सांगितला. एकट्या भाजपाला इतक्या जागांवर आघाडी मिळेल असा दावा या नेत्याने केला आहे.

भाजपचे 148 जागांवर उमेदवार

2019 मध्ये अखंड शिवसेनेसोबत युती असताना भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर आताच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागांचा आकडा 148 च्या घरात पोहचला आहे. शिंदे सेनेला 85 जागा तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 51 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे गेल्या विधानसभेच्या तुलनेत भाजपाने 16 जागा कमी घेतल्या आहेत. तर मित्रपक्षांच्या जागांवर त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे एकूण भाजप 2019 मधील विधानसभा इतक्याच जागा लढवत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashatra Vidhansabha Election 2024) जाहीर झाली. त्यासाठी आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून लागू झाली. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबरला जारी करण्यात आली होती. या 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल अंतिम तारीख होती. तर आज 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी झाली. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.

भाजप इतक्या जागांवर घेईल आघाडी

भाजप १५० पैकी ११० ते ११५ जागांवर विजयी होईल असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात २३ नोव्हेंबरला पुन्हा दिवाळी साजरी होणार असल्याचे ते म्हणाले. भाजपाच्या विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील जनता बहुमत देईल. भाजप ११०-११५ जागा निश्चित जिंकेल असा विश्वास दिवाळीच्या शुभेच्छा देताना कंबोज यांनी व्यक्त केला. आता एका महिन्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे समोर येईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीड हजार दिलेत… 3 हजार वसूल करणार! भाजपाच्या महिला उपाध्यक्षाची लाडक्या बहिणींना दमबाजी दीड हजार दिलेत… 3 हजार वसूल करणार! भाजपाच्या महिला उपाध्यक्षाची लाडक्या बहिणींना दमबाजी
1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 रुपये वसूल करणार, अशी दमबाजी कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी...
पुण्यात पोलिसांनी जप्त केलेले 5 कोटी गेले कोठे? युवक काँग्रेसचा सवाल
मोदीजी, महाराष्ट्रात तुमची नाही, फक्त ठाकरेंची गॅरंटी चालते! उद्धव ठाकरे यांच्या दणदणीत सभा, भाजपवर जोरदार हल्ला
वांद्रे पूर्व – पुनर्विकासाचा प्रश्न निर्णायक ठरणार
महाराष्ट्राला गुजराष्ट्र, अदानीराष्ट्र करण्याचा भाजपचा डाव; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
जीवनदायी सेवाकार्याला एक तप पूर्ण, बाळासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान उपक्रम
महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर मोदी युगाचा अस्त होईल, शरद पवार यांचे भाकीत