Navratri 2024 – माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी, 80 CCTV ची परिसरावर नजर

Navratri 2024 – माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी, 80 CCTV ची परिसरावर नजर

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण व मुळपीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्र उत्सवास बुधवार दि.3 ऑक्टोबरपासून घटस्थापना होऊन प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगरात भक्तांचा महापूर व हाकेला ओ देणार्‍या श्री रेणुकादेवीचा गजर भाविक नऊ दिवस करणार असून गडावर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

गडावरील श्री रेणुकादेवीच्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी श्री रेणुकादेवी संस्थानच्या विश्वस्त समितीने केली आहे. मंदिर परिसरात रंगरंगोटी विद्युत रोषणाई केळीचे खांब, आंब्याच्या पानांचे तोरण आदी शुभ वस्तूने मंदिर सजविले आहे.  प्रशासनातर्फे सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असून, 80 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची परिसरावर नजर असणार आहे. सोलापुर येथील स्वराज्य रक्षक सेक्रूटी सर्व्हिसचे 45 प्रशिक्षण घेतलेले  सुरक्षारक्षक अतिरिक्त म्हणून बोलावले आहेत. मुख दर्शन दिसण्याकरीता एलसीडी स्क्रीन व 1 वाल बसविण्यात आली आहे. रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर, पदसिद्ध उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, सचिव/किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, कोषाध्यक्ष माहूरचे तहसीलदार किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, भवानीदास भोपी, दुर्गादास भोपी, व्यवस्थापक योगेश साबळे यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे बुधवार दि.3 रोजी सकाळी 6 पासून सनई वादन व 7 ते 11.30 दरम्यान मंत्रोच्चारात मुख्य देवता श्री रेणुकामातेच्या महापूजेस प्रारंभ होणार आहे. रेणुकादेवीच्या मुख्य गाभार्‍यातील घटस्थापना व परिवार देवता तुळजाभवानी, महालक्ष्मीमाता व परशुराम मंदिर परिसरात घटस्थापना होईल व आई रेणुकामातेला पिवळ्या रंगाचे महावस्त्र परिधान करण्यात येईल, अशी माहिती विश्वस्त समितीने दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

KBC 16 : अखेर अमिताभ बच्चन यांच्या ओठावर ती गोष्ट आलीच; बिग बी म्हणाले, ती इच्छा अपुरीच राहिली… KBC 16 : अखेर अमिताभ बच्चन यांच्या ओठावर ती गोष्ट आलीच; बिग बी म्हणाले, ती इच्छा अपुरीच राहिली…
‘कौन बनेगा करोड़पति 16’लाही अत्यंत उदंड प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 24 वर्षापासून महानायक अमिताभ बच्चन हा शो करत आहेत. एवढ्या...
बदलापूर प्रकरणात फरार असलेले सहआरोपी शाळेचे संस्थापक आणि सचिवांना अटक
गृहमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी खराब, सुप्रिया सुळे यांची टीका
Mumbai News – हाजीअली दर्गा उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, हरियाणातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
वाराणसीपाठोपाठ लखनौमध्येही साईबाबा हटाओ मोहीम! अखिल भारतीय हिंदू महासभेचा फतवा
अटल सेतूवरून आणखी एकाची उडी, मानसिक तणावातून व्यावसायिकाने जीवन संपवले
Ind Vs Ban Test Series 2024 – हिंदुस्थानने बांगलादेशवर विजय मिळवताच, रमीझ राजा यांची प्रतिक्रिया चर्चेत