भाजपाने लढण्याआधीच हार मानली, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार!

भाजपाने लढण्याआधीच हार मानली, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार!

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आपल्याला जागा मिळावी याचा विचार करत असतो. पण महायुतीमध्ये जागा वाटपावरून महाभारत सुरु आहे ते पहा, त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार हे त्यांना विचारा, असे ग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारने 10 वर्षात महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारात भाजपा सरकारने विक्रम केला आहे, कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत, महागाई प्रचंड वाढली आहे, अशी अवस्था असून या महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस जनतेने केला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल.

यावेळी बोलताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार व गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण व इस्राईलमध्ये आज जे सुरू आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गाधींजींनी घालून दिलेला आदर्श व अहिंसेचा मार्गच महत्वाचा ठरतो, जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गांधींजींनी घालून दिलेल्या मागार्चा अवलंब करावा.

मोदी गांधींचं नाव घेतात, पण जाती-धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडतात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांचे नाव सातत्याने घेत असतात, पण ते गांधीजींचा आदर्श तसेच गांधीजींनी घालून दिलेला अहिंसेच्या मार्गाचे पालन करताना दिसत नाहीत. जातीच्या धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम ते करत आहेत, हे देशाच्या हिताचे नाही. देशाच्या विकास व प्रगतीसाठी गांधी विचारच महत्वाचा आहे त्याचा अवलंब त्यांनी करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

शेवटची धडपड सुरू

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याआधीच महाराष्ट्रात पराभव मान्य केला आहे. भाजपाची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी आहे तेच महाराष्ट्रातही भाजपा मित्रपक्षांसोबत करत आहे असेही चेन्नीथला म्हणाले. भाजपा सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे पण सरकारकडे पैसा नाही व निवडणूक होणार असल्याने त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारची शेवटची धडपड सुरु आहे, पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. त्यांना सर्व समजते, असेही चेन्नीथला म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल
लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेवर काही भाऊरायांनी पण...
Govinda Firing Case : गोळी लागली की मारली? गोविंदाची थिअरी काही पचनी पडेना, चीची भय्या अडचणीत, यामुळे पोलिसांचा बळावला संशय
त्यांना काय तोंड दाखवू?, नरहरी झिरवळ आपल्याच सरकारवर हताश, हतबल; म्हणाले, फक्त आजचा दिवस…
वर्षा उसगांवकर यांना कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मिळाले होते महाभारतात काम
लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड, जीपीएसद्वारे लोकेशन ट्रेस करत आरोपीला अटक
मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटांत गोळीबार, आसाम रायफल घटनास्थळी दाखल
टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?