समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील अपघाताने आरटीओने या महामार्गावरील गस्त वाढवून वाहनांना शिस्त लावण्यासाठी गेली दोन वर्षे उपाययोजना केल्या त्याला आता हळूहळू यश येत आहे.जानेवारी ते ऑगस्ट 2023 या आठ महिन्यात समृद्धी महामार्गावर 63 प्राणांकित अपघातात 120 जणांचा बळी गेला होता. यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट 2024 मध्ये 57 प्राणांकित अपघातात 80 जणांचा बळी गेला आहे. म्हणजे अपघातात 10 टक्के कमतरता झाली आहे. तर एकूण अपघाताच्या संख्येत 19 टक्के घट झाली आहे.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर साल 2023 मध्ये 81 प्राणांकित अपघातात 151 जणांचे प्राण गेले. तर गंभीर जखमी करणारे 17 अपघात घडले असून त्यात 42 जण गंभीर जखमी झाले. तर किरकोळ जखमी असणारे 22 अपघात घडले असून 52 जण किरकोळ जखमी झाले. तर 14 अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. असे साल 2023 मध्ये 134 अपघात घडले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

जानेवारी ते ऑगस्ट 2023 या काळात 63 प्राणांकित अपघात घडले असून त्यात 120 जणांचा मृत्यू झाला. तर याच आठ महिन्याच्या काळात 17 गंभीर जखमी करणारे अपघात घडले असून यात 30 जण जखमी झाले. तर किरकोळ जखमा होणारे 20 अपघात घडले असून यात 40 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर आठ अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. अशा प्रकारे आठ महिन्यात गेल्या वर्षी एकूण 103 अपघात घडले.

तर यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट 2024 या आठ महिन्याच्या काळात अपघाताची संख्या घटली असून या काळात 57 अपघात घडले असून त्यात 80 जण जखमी झाले आहेत. म्हणजे प्राणांकित अपघाताची संख्या 10 टक्के घटली आहे. तर 15 गंभीर जखमी होणारे अपघात घडले असून त्यात 39 जण गंभीर जखमी झाले आहेत. म्हणजे गंभीर अपघाताच्या संख्येत 25 टक्के तर गंभीर जखमींच्या संख्येत 30 टक्के कमी झाली आहे.

तर किरकोळ जखमी होणारे 8 अपघात घडले असून त्यात 17 जण किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी अपघातांच्या संख्येत 60 टक्के घट झाली असून किरकोळ जखमीच्या संख्येत 58 टक्के घट झाली आहे.तर 3 अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. असे एकूण 83अपघात घडले आहेत. कोणीही जखमी न होणाऱ्या अपघाताच्या संख्येत 63 टक्के घट झाली आहे. तर एकूण अपघाताच्या संख्येत 19 टक्के घट झाली आहे.

अशी झाली कारवाई –

नाशिक ते नागपूर या मार्गावर 24×7 आठ इंटरसेप्टर व्हेईकल तैनात करण्यात आले आहे. ओव्हर स्पीडींग वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी लेसर गनचा वापर करण्यात आला. सर्व बस चालकांची ड्रंक एण्ड ड्रायव्हींग मोहीमेत ब्रेथ अनालायझर टेस्ट करण्यात आली. ट्रेड गेज मशिनद्वारे टायरची तपासणी करण्यात आली. अनफिट व्हेइकलची तपासणी करण्यात आली तर लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर देखील कारवाई केली गेली. ओव्हर स्पीडींग ड्रायव्हरना टोल प्लाझा येथे काऊन्सिलिंग करण्यात आले.

समृद्धी महामार्गावर 1,03,261 टायर तपासणी, 1,564 रेफलेक्टींग टेप, 18,776 बस आणि 24,008 मालवाहतूक चालकाची ब्रेथ एनालायझरची टेस्ट करण्यात आली. त्यात 109 बसचालक आणि 53 अवजड चालक दोषी सापडले. 3,879 ड्रायव्हरचे काऊन्सिलिंग केले गेले. अशा या कारवाईत एकूण 33,56,205 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल
लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेवर काही भाऊरायांनी पण...
Govinda Firing Case : गोळी लागली की मारली? गोविंदाची थिअरी काही पचनी पडेना, चीची भय्या अडचणीत, यामुळे पोलिसांचा बळावला संशय
त्यांना काय तोंड दाखवू?, नरहरी झिरवळ आपल्याच सरकारवर हताश, हतबल; म्हणाले, फक्त आजचा दिवस…
वर्षा उसगांवकर यांना कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मिळाले होते महाभारतात काम
लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड, जीपीएसद्वारे लोकेशन ट्रेस करत आरोपीला अटक
मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटांत गोळीबार, आसाम रायफल घटनास्थळी दाखल
टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?