तर लाडकी बहीण योजना बंद करू… काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या विधानावर राजकारण तापले; कुणाकुणाच्या निशाण्यावर?

तर लाडकी बहीण योजना बंद करू… काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या विधानावर राजकारण तापले; कुणाकुणाच्या निशाण्यावर?

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून त्यावर टीका सुरू आहे. या योजनेत काही ना काही अडथळे आणण्याचे प्रयत्नही केले जात आहे. मात्र, राज्य सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली आहे. आता या योजनेवर काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी मोठं विधान केलं आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे. केदार यांच्या या विधानाचा सत्ताधारी आमदारांकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सुनील केदार यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. सत्ता आल्यास लाडकी बहीण योजना बंद करू असं केदार म्हणाले आहेत. यावरून काँग्रेसची मानसिकता उघड झाली आहे. हे प्रकरण नागपूर उच्च न्यायालयात सुरू आहे. लाडकी बहीण योजना ही यशस्वी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 60 लाख महिलांना मदत मिळत आहे. महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींच्या घरी मुख्यमंत्री भेट देत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. आधीच काँग्रेसला अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागत असून त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेस हादरली आहे, असं संजय निरुपम यांनी म्हटलंय.

इकडे विरोध, तिकडे कॉपी

लाडकी बहीण योजना ही महिलांचे मते विकत घेण्याची योजना आहे, असं सुनील केदार म्हणाले. खरं तर असं विधान करणं हा महिलांचा अपमान आहे. महाराष्ट्रात काँग्रेस लाडकी बहीण योजनेला विरोध करत असताना झारखंडमध्ये सरकारने या योजनेवर आधारित मैय्या सन्मान योजना आणली आहे. बदलापूर येथील आंदोलनावेळी त्यांनी लाडकी बहिण योजनेचे पोस्टर आणले होते. महाविकास आघाडी या योजनेच्या विरोधात आहे. सुनील केदार आणि काँग्रेसने महाराष्ट्रातील महिलांची माफी मागावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

हाच काँग्रेसचा खरा चेहरा

सुनील केदार यांच्या विधानावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहrण योजना’ भविष्यात महाभकासचं सरकार जर आलं तर काँग्रेसचे भ्रष्ट नेते सुनील केदार ती बंद करणार आहेत म्हणे. महाराष्ट्रातील चांगल्या योजनांना कायम विरोध करणारा हा आहे लाचार काँग्रेसचा खरा चेहरा, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज
नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होणार असून मुंबईची ग्रामदेवी असलेल्या श्री मुंबादेवी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे....
तांत्रिक बिघाडाने ठाकुर्ली-कल्याण मार्गावर लोकल प्रवाशांची लटकंती
‘प्रवाहाती’मधून भरतनाटय़म नर्तिका गीता चंद्रन यांचा पाच दशकांचा प्रवास उलगडणार 
ऐकावं ते नवलच! अख्ख्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न फक्त दोन रुपये
सोनम वांगचुक यांना अटक हा मोदी सरकारचा मूर्खपणा, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर
परिणीती चोप्रा हिने शेअर केले पतीसोबतचे अत्यंत खास फोटो, अभिनेत्री रोमांटिक होत…
गरबा मंडपात गोमूत्र पाजून एण्ट्री द्या! भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य