पुण्यात विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्ते अन् पोलिसांची बाचाबाची, पोलिसांकडून बळाचा वापर, भिवंडीत दगडफेक

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्ते अन् पोलिसांची बाचाबाची, पोलिसांकडून बळाचा वापर, भिवंडीत दगडफेक

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 24 तास झाले आहेत. त्यानंतरही अजून ही मिरवणूक सुरुच आहे. बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 116 गणेश मंडळाचे विसर्जन झाले आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस हार घालून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड या मार्गावरून अजूनही मिरवणूक सुरू आहे. मिरवणूक शांततेत सुरु आहे. परंतु अलका चौक आणि टिळक रस्त्यावर पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. भिवंडीत मूर्तीवर दगडफेक झाल्यामुळे तणाव निर्माण झाला.

अलका चौकात तणाव

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्ते अन् पोलिसांची बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. गणेश मंडळाचे कार्यकर्ते ऐकत नसल्यामुळे पोलिसांकडून बळाचा वापर झाला. अलका चौकात एक सार्वजनिक गणेश मंडळ एका जागी थांबून डीजे वाजवत होते. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मंडळाची मोठी कोंडी झाली. त्या मंडळास पोलिसांनी वारंवार सांगून देखील कार्यकर्ते मंडळाची मूर्ती पुढे नेत नव्हते. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या ठिकाणी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी येत वाद थांबावत त्या गणेश मंडळाला पुढे सरकवले.

टिळक रस्त्यावर साऊंड सिस्टीमवरुन वाद

टिळक रस्त्यावर साऊंड सिस्टिमवरुन वाद झाला. गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत साऊंड सिस्टिम बंद ठेवली होती. परंतु त्यानंतर सकाळी सहा वाजता पोलिसांनी साऊंड सिस्टीम सुरु करु दिली नाही. पुण्यातील इतर मार्गाने जाणाऱ्या मिरवणुकीत मात्र साऊंड सिस्टीम सुरु करण्यात आल्या होत्या. यामुळे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या मंडपासमोरच ठिय्या आंदोलन केले. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून साऊंड सिस्टिमवर गणपतीची आरती लावण्यात आली. त्यानंतर मिरवणूकला पुन्हा जल्लोषात सुरुवात झाली.

पुणे विसर्जन मिरवणुकीत अलका चौकात तणाव निर्माण झाला होता.

भिवंडीत मूर्तीवर दगडफेक

भिवंडीतील घुंघटनगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी कामवारी नदीकडे रात्री 1 वाजता जात असताना मूर्तीवर दगडफेक झाली. या घटनेत गणेशाच्या मोठ्या मूर्ती खंडीत झाली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. तणाव वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांना पकडत नाहीत, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन केले जाणार नाही, अशी भूमिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा? मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट समाजातील विविध नेते घेत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर...
सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, लग्न करण्यापूर्वी ठेवली होती ही अट
‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप, थेट सूरज चव्हाणला..
Ind Vs Ban Test Series 2024- आमची 100 धावांवर बाद होण्याची तयारी होती…; रोहित शर्मा स्पष्टचं बोलला
फडणवीसांच्या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो ताटातील चटणीसारखा, अंबादास दानवे यांचा जबरदस्त टोला
सुंदर संतती प्राप्तीसाठी वहिनी दिरासोबत पळाली, पतीची पोलिसात धाव
दसर्‍याच धुणे धुण्यासाठी गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू, पत्नीला वाचविण्यात नागरिकांना यश