मल्हारीचा भंडारा भेसळीने बेरंग; जेजुरीत सर्रास विक्री, आरोग्यावर परिणाम

मल्हारीचा भंडारा भेसळीने बेरंग; जेजुरीत सर्रास विक्री, आरोग्यावर परिणाम

>>प्रकाश खाडे

जेजुरीचा खंडोबा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. भंडारा आणि खोबरे या दैवताला विशेष प्रिय. भाविकांकडून गडावर मुक्तहस्ते उधळण केल्या जाणाऱ्या मल्हारीच्या या भंडाऱ्याचा मात्र भेसळीने बेरंग झाला आहे. येथील विक्रेते सर्रास भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री करीत असून, या भंडाऱ्यामुळे भाविकांबरोबरच स्थानिकांच्याही आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.

जेजुरीत वर्षभरात खंडोबाच्या सात ते आठ मोठ्या यात्रा भरतात. वर्षाकाठी सुमारे एक कोटी भाविक देवदर्शनासाठी जेजुरीत येतात, त्यांच्याकडून भंडारा खोबरे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. या व्यवसायातून जेजुरीत मोठी आर्थिक उलाढाल होते. खंडोबाला भंडारा वाहण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. भंडारा खोबरे देवाला वाहून गडामध्ये असणाऱ्या कासवावर भाविक भंडार खोबरे उधळतात. भंडारा-खोबरे श्रद्धेने एकमेकांना प्रसाद म्हणून वाटतात. खोबऱ्याचा प्रसाद खाताना भेसळयुक्त भंडारा त्यांच्या पोटात जातो. गडावर भंडाऱ्याची उधळण मोठ्या प्रमाणात होत असल्याने उधळलेला भंडार भाविकांच्या डोळ्यामध्ये, तोंडामध्ये जातो. भंडाऱ्यामुळे अंगावर पुरळ उठणे, खाज सुटणे, त्वचा काळी पडणे, खोकला येणे अशा गंभीर आजारांना ग्रामस्थ, भाविकांना तोंड द्यावे लागत आहे. जेजुरीतील अनेकांची कपाळे दररोज भंडारा लावल्याने काळी पडली आहेत. भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्या विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

अशी केली जाते भेसळ
चिंचुका, मक्याच्या पिठात केमिकल घालून बनावट भंडारा तयार केला जातो, या भंडाऱ्याची पोती स्वस्त मिळतात. सध्या हळदीचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेक दुकानदार भेसळयुक्त भंडार विकत आहेत. याबाबत पूर्वी अनेक तक्रारी झाल्या होत्या. मात्र, अन्न औषध भेसळ प्रशासनाने हा भंडारा उधळण्यासाठी असल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही असे सांगितल्याचे समजते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस सोडा सणासुदीत पगार तरी मिळेल की...
अमेरिकेत नको तर..; कॅन्सरवरील उपचाराबद्दल हिना खानला महिमा चौधरीने दिला सल्ला
IIFA 2024: सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख, तर अभिनेत्री राणी मुखर्जी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
IIFA Awards 2024: बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचा बोलबाला, हॉलिवूडकडे ‘बादशाह’ का फिरवतो पाठ? कारण समोर
IIFA Awards 2024: पाच फिल्म इंडस्ट्रीजचा भव्यदिव्य उत्सव; 3 दिवसांच्या ‘आयफा अवॉर्ड्स’मध्ये काय काय पहायला मिळणार?
ती जागा जेलसारखी..; पलकच्या आरोपांनंतर ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर भडकली जेनिफर
वाढीव टप्प्याचा आदेश काढा; अन्यथा आम्हाला गोळ्या घाला, विनाअनुदानित शिक्षकांचा उद्विग्न सवाल