‘कोई मिल गया’ सिनेमानंतर रजत बेदीने अचानक का सोडलं बॉलिवूड आणि देश?

‘कोई मिल गया’ सिनेमानंतर रजत बेदीने अचानक का सोडलं बॉलिवूड आणि देश?

कोई मिल गया या सिनेमातून हृतिक रोशनने भरपूर प्रसिद्धी मिळवली. या सिनेमात त्याची भूमिका लोकांना खूप आवडली. पण या सिनेमात आणखी एक अभिनेता होता. जो विलनच्या भूमिकेत होता. ज्याची तुलना कधीतरी अक्षय कुमार सारख्या अभिनेत्यासोबत केली जायची.  तो इंडस्ट्रीत आल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. पण तो इंडस्ट्रीत लांबलचक इनिंग खेळू शकला नाही. हा अभिनेता हळूहळू अज्ञाताच्या अंधारात हरवून गेला. एक दिवस त्याने बॉलिवूडचा कायमचा निरोप घेतला. प्रसिद्ध अभिनेता रजत बेदी अचानक कुठे गायब झाला कोणालाच कळाले नाही. तो आता कुठे आहे, तो काय करतो आणि त्याने या झगमगत्या जगाचा निरोप का घेतला हे आपण जाणून घेणार आहोत.

रजत बेदी याचा जन्म 1 जानेवारी 1970 रोजी मुंबईत झाला. रजतकडे भारताचे नाही तर कॅनडाचे नागरिकत्व आहे. सध्या रजन हा 54 वर्षाचा आहे. अभिनेता असण्यासोबतच रजत बेदी हा निर्माता देखील आहे. 2003 मध्ये रिलीज झालेल्या ‘कोई…मिल गया’ मुळे तो घराघरात नावारूपाला आला. पण नंतर त्याला कोणीही पाहिले नाही. रजतचे वडील नरेंद्र बेदी हे देखील चित्रपट निर्माते होते. त्यांचे आजोबा राजेंद्र बेदी लेखक होते आणि ते मानेक बेदी यांचे भाऊ आहेत.

रजतने 1990 मध्ये अभिनयाला सुरुवात केली होती. त्याने 1998 मध्ये ‘दोबारा’ आणि 1995 मध्ये ‘करण अर्जुन’ सारख्या चित्रपटात काम केले. रजत ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामाही अशा वेगवेगळ्या भूमिका करत असे. तो फिटनेसचा वेडा होता. खूप घाम गाळायचा आणि मजबूत शरीर राखायचा.

रजतने हिंदीशिवाय साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले. कन्नड आणि तेलगू व्यतिरिक्त तो पंजाबी चित्रपटांमध्येही दिसला होता. तो शेवटचा 2023 मध्ये अहिंसा सिनेमात दिसला होता. पण 2008 नंतर तो जवळजवळ या इंडस्ट्रीमधून गायब झाला आणि त्यानंतर 2012 मध्ये पुनरागमन केले. त्यानंतर तो 5 वर्षांनी पडद्यावर दिसला आणि त्यानंतर 7 वर्षांनी चित्रपट मिळाला.

रजतने इंडस्ट्री सोडली का?

याला कारण आहे ‘कोई… मिल गया’ हा चित्रपट. या चित्रपटातून रजतचे अनेक सीन्स कट करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रमोशनल इव्हेंटमध्येही त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यानंतर तो खूप निराश झाला आणि त्याने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

रजत कॅनडामध्ये स्थायिक झाला होता

निराश झाल्यानंतर रजत कॅनडाला निघून गेला होता. तेथे त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्याची पत्नी ही आर्किटेक्ट आहे. बिझनेस चांगला चालला, पण रजतला पुन्हा अभिनय करण्याची इच्छा होती. त्यामुळे तो पुन्हा मुंबईला परतला. पण त्याला पुन्हा हवी तशी किर्ती मिळू शकली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

EVM नव्हतं म्हणूनच ABVP चा सुफडासाफ’, संजय राऊत यांची बोचरी टीका EVM नव्हतं म्हणूनच ABVP चा सुफडासाफ’, संजय राऊत यांची बोचरी टीका
बहुचर्चित आणि वादात राहिलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेटच्या विजयानंतर मातोश्रीवर जल्लोष झाला, घोषणाबाजी केली. दरम्यान, पदवीधर निवडणुकीनंतर पदवीधरांनी सरकारला धडा शिकवल्याचा...
या देशात याकूब मेमनच्या दफनासाठी जागा मिळते, पण अक्षयला… आरोपीच्या वकिलाची खदखद काय?
शबाना आझमी यांच्या ‘त्या’ विधानाने मोठ्या वादाला तोंड?, थेट म्हणाल्या, भारतात कायमच महिलांना…
हरयाणात बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, तीन जणांचा मृत्यू
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, शरद पवारांनी भाजप आमदाराला सुनावले
Ratnagiri News – विधानसभा निवडणूक कधीही होवो दापोलीत शिवसेनाच, माजी आमदार संजय कदम यांना ठाम विश्वास
Photo – मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत दणदणीत विजयानंतर मातोश्री येथे जल्लोष