G5A चा नववा सीझन; कलात्मक वारसा, विचारांचे विश्व अन् सिने जगताची विजयगाधा उलगडणार

G5A चा नववा सीझन; कलात्मक वारसा, विचारांचे विश्व अन् सिने जगताची विजयगाधा उलगडणार

मुंबईतील सांस्कृतिक चळव‌ळीत आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलेल्या G5A चा सांस्कृतिक उत्सव येत्या आठवडाभरात मुंबईकरांच्या भेटीला येत आहे. मुंबईकर रसिक आतुरतेने वाट पाहत असलेला हा बहुविद्याशाखीय सीझन यंदा महालक्ष्मी येथे होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये नानाविध कलाविष्करांचा समावेश करण्यात आलेला असून त्यामध्ये प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला आव्हान तर मिळणारच आहे, परंतु त्याचबरोबर त्यांना प्रेरणाही मिळणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये विविध विद्याशाखांतील कार्यक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खास अनुभवाची प्रचिती नक्कीच येणार आहे. तब्बल तीन महिने अतिशय सखोल विचारातून या सीझनमधील कार्यक्रमाची रुपरेषा आकारास आली असून त्यामु‌ळे यंदाचा सीझन ऐतिहासिक ठरणार आहे.

येत्या 2 ऑक्टोबर 2024 ला महालक्ष्मी येथील वेअरहाऊसमध्ये उत्सवाचा शुभारंभ प्रख्यात नृत्यांगना मल्लिका साराभाई यांच्या सादरीकरणाने होणार आहे. मल्लिका साराभाई यांची नृत्य विश्वातील आत्तापर्यंतची कामगिरी म्हणजे एक वारसा आहे. त्यांचे नृत्य भूतकाळाला वर्तमानाशी जोडते. त्यांच्या नृत्यशैलीतून सहयोग, शतकानुशतके फुलत गेलेली नृत्यशैली याचे दर्शन होतानाच स्त्री आवाजाच्या उत्क्रांतीची अनोखी सफरही घडते. सारांगणा यांच्या सादरीकरणाला गायिका अदिती रमेश या तिच्या जॅझ आणि कर्नाटक संगीतशैलीची जोड देणार असून त्यामुळे हे सादरीकरण अतिशय बहारदार होणार आहे.

त्याच दिवशी सायंकाळी मान्यवर वक्ते विविध मुद्दांवर आपले विचार मांडणार आहेत. प्रेम आणि व्देष या संकल्पनांशी निगडीत ते आपले विचार मांडताना सध्याच्या वातावरणात काहीशी अरुंद झालेली वाट मोकळी करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकमेकांच्या विचाराबद्दल आदरभाव व्यक्त करण्याची संकल्पना प्रकाशझोतात आणण्यावर ही थीम आपले लक्ष केंद्रित करणार आहे. तर चार ऑक्टोबरला फेय डिसोझा यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण आधारित वादविवाद केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. या वादविवादरुपी चर्चेत दोन्ही बाजूंच्या तज्ज्ञ मुंबईला हवामानातील लवचिकतेचे उदाहरण मानले जाऊ शकते का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महिन्याच्या पहिल्या वीकेंडची सुरुवात सिनेमा हाऊसने होणार आहे. यात अशा आगळ्यावेगळ्या चित्रपटांचा उत्सव साजरा केला जाणार आहेत की, जे अनेक अडचणी, अडथळ्यांचे आव्हाने लिलया पेलत रुपेरी पडद्यावर अवतरण्यात यशस्वी ठरले आहेत आणि दीर्घकाळापासून हे चित्रपट आजही चर्चेत आहेत. या चित्रपटांबद्दल मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत. यंदाच्या या हंगामात विविध विचारधारा आणि सर्जनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून महालक्ष्मीचे वेअरहाऊस जिवंत होणार आहे. त्यातून चिंतनशीलतेचा झरा प्रवाहित होणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सहानुभूतीपूर्ण भविष्य घडवण्यासाठी कला आणि विचार मंथनाच्या सामर्थ्याची जोड मिळणार असून आयोजक म्हणून याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

जी5एच्या संस्थापक आणि कलात्मक विभागाच्या संचालक अनुराधा पारीख याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या, “नऊ वर्षापासून सुरु असलेली वाटचाल ही खरोखर अविश्वनीय आणि अप्रतिम आहे ! त्या काळात आम्ही ज्यांच्यासोबत काम केले आणि ज्यांनी जी5ए आणि आमच्या सामूहिक कला परिसंस्थेबद्दल विश्वास आणि बांधिलकी दाखविली, त्या प्रत्येक घटकाचे मी खरोखर आभारी आहे. त्याचबरोबर विविध कलाविष्कारांचे सादरीकरण, सिनेमा, कलेची मुहूर्तमेढ आणि विचारांचे आदानप्रदान करणाऱ्या संभाषणांचा आणखी एक महत्त्वाचा हंगाम गुंफण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या आमच्या टीमलासुध्दा मी धन्यवाद देते. या नऊ वर्षांमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. आपले शहर आणि देशाच्या कला परिसंस्थेत आम्ही सुरु केलेल्या मिशनमध्ये अनेक नवीन बदलही केले आहेत. आजच्या जगतात संस्कृतीला असलेल्या महत्वाबाबत असलेली आमची ठाम धारणा अनेक घटकांमुळे दृढ झाली आहे. त्यात आम्ही ज्या कलाकारांसोबत काम करतो ते कलाकार, वेअरहाऊसमध्ये आमच्यासोबत उत्सुकतेने सामील होणारे प्रेक्षक आणि आमच्या दृष्टी आणि ध्येयावर विश्वास ठेवणारे भागीदार यांच्यामुळे आमची धारणा दृढ झाली आहे आणि तिला नवे रुपही प्राप्त झाले आहे.”

जी5एचे ( G5A ) संस्थापक आणि कलात्मक विभागाचे संचालक ईशान बेनेगल म्हणाले, “ गेल्या अनेक वर्षांपासून दृढतेने करत असलेल्या कार्याला आणखी बळ देण्यासाठी यंदाच्या नवव्या वर्षात आम्ही या नवीन हंगामात नव्या उत्साहाने, आनंदाने भारावलेलो आहोत. या हंगामात स्वतंत्र सादरीकरण आणि सरावाच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षक आणि कलाकारांमध्ये उत्साहाचे नवे वारे आणत आहोत. आमचे हे आगळेवगळे वैषिष्ट्ये आमचे हेतू आणखी व्यापक आणि ठळक करतात. त्याचरोबर धाडसी, निर्भय आणि न्याय्य असलेल्या सांस्कृतिक अभिव्यक्तीकडे लक्ष केंद्रित करतात.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बांगलादेशी बन्ना शेख मुंबईत येऊन बनली रिया बर्डे, अडल्ट चित्रपटात काम… पोर्न स्टारने पूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडीही बनवला बांगलादेशी बन्ना शेख मुंबईत येऊन बनली रिया बर्डे, अडल्ट चित्रपटात काम… पोर्न स्टारने पूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडीही बनवला
मुंबईतील ठाण्यात रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला अटक करण्यात आली. बांगलादेशी ही मॉडेल संपूर्ण परिवारासोबत घुसखोरी करुन पश्चिम बंगालमध्ये...
सिनेटचा विजय ही तर सुरुवात, विधानसभेला…; आदित्य ठाकरे काय म्हणाले?
Senate Election : हा दस का दम… आदित्य ठाकरे यांनी विजयी होताच भरला हुंकार
‘धर्मवीर’ सिनेमावर वाद, सुषमा अंधारे यांचं ट्विट, प्रवीण तरडे म्हणाले, ‘दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’
अखेर ऐश्वर्या राय हिने केला मोठा खुलासा, थेट म्हणाली, माझी मुलगी…
लता मंगेशकर यांची ‘प्रेम कहाणी’ का राहिली अधुरी? त्यांच्यावर झालेला विष प्रयोग आणि बरंच काही…
ऐश्वर्या राय हिने लेकीसाठी केले ‘हे’ काम, आराध्या बच्चन आणि अभिनेत्री…