गर्दीचा फायदा घेत त्याने ईशा देओलला चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श; अभिनेत्रीने थेट वाजवली कानाखाली

गर्दीचा फायदा घेत त्याने ईशा देओलला चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श; अभिनेत्रीने थेट वाजवली कानाखाली

अभिनेत्री ईशा देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस’ या चित्रपटाचं प्रीमिअर पुण्यात आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने ईशाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. त्यावेळी ईशाने त्याला गर्दीतून खेचून कानाखाली मारली होती. ‘द मेल फेमिनिस्ट’ या चॅट शोच्या एपिसोडमध्ये ईशाने हा किस्सा सांगितला. अशा गोष्टी मी अजिबात सहन करू शकत नाही, असं ईशा म्हणाली. त्याचप्रमाणे तिने इतर महिलांनाही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका आणि आवाज उठवा असा सल्ला दिला.

या घटनेविषयी सांगताना ईशा म्हणाली, “दस या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा किस्सा घडला होता. या चित्रपटात संजय दत्त, सुनील शेट्टी, झायेद खान आणि अभिषेक बच्चन यांच्या भूमिका होत्या. प्रीमिअरला खूप गर्दी जमली होती आणि त्या गर्दीतून आम्ही पुढे चालत होतो. सगळे कलाकार एकानंतर एक पुढे जात होते. माझ्या अवतीभवती मोठे आणि ताकदवान बाऊन्सर्स होते. तरीसुद्धा त्या गर्दीत एका व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. ते जाणवताच मी गर्दीतून त्या व्यक्तीचा हात खेचला आणि त्याच्या कानाखाली वाजवली होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

“मला शक्यतो लवकर राग येत नाही. पण असं काही झालं तर मी ते सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत महिलांनी आवाज उठवलाच पाहिजे. पुरुष हे शारीरिकदृष्ट्या अधिक ताकदवान असल्याने ते आपला अशा पद्धतीने फायदा उचलू शकत नाही. महिला या भावनिकदृष्ट्या खूप सक्षम असतात”, असं ईशा पुढे म्हणाली.

ईशा देओल ही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे. जून 2012 मध्ये तिने भरत तख्तानीशी लग्न केलं होतं. ऑक्टोबर 2017 मध्ये ईशाने मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर जून 2019 मध्ये ती दुसऱ्या मुलीची आई बनली. राध्या आणि मिराया अशी तिच्या मुलींची नावं आहेत. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ईशा आणि भरत यांनी विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. लग्नाच्या 12 वर्षांनंतर ईशा आणि भरत यांनी घटस्फोट घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मास्टरस्ट्रोक, उमेदावारांसह-पक्षाची डोकेदुखी वाढली, नक्की निर्णय काय? Maharashtra Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मास्टरस्ट्रोक, उमेदावारांसह-पक्षाची डोकेदुखी वाढली, नक्की निर्णय काय?
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाबाबतची चर्चा अखेरच्या टप्प्यात आहे. तर काही जागांवरुन घोडं...
maharashtra assembly election date 2024: महाराष्ट्रात निवडणुका एका टप्प्यात होणार का? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितले
कल्याण, कुर्ला, कोलाबा या ठिकाणी सर्वात कमी मतदान, निवडणूक आयोगाने काय म्हटलं
Maharashtra Election 2024 : महाराष्ट्राच्या महानिवडणुकीची काय तयारी; कधी होतील तारखा घोषीत, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले नव्हते, आता काय होणार… निवडणूक आयुक्त म्हणाले….
ऐश्वर्या रायने IIFA च्या व्यासपीठावर या व्यक्तीचे धरले पाय, बच्चन कुटुंबातील…
सैफ अली खान याच्याकडून अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला, माझ्या…