मुंबईत पावसाचं थैमान, जोगेश्वरीत महिला मॅनहॉलमध्ये पडली, कल्याणमध्ये वीज कोसळून 2 मजुरांचा मृत्यू

मुंबईत पावसाचं थैमान, जोगेश्वरीत महिला मॅनहॉलमध्ये पडली, कल्याणमध्ये वीज कोसळून 2 मजुरांचा मृत्यू

मुंबईत आलेल्या परतीच्या पावसाने शहरात अक्षरश: थैमान घातलं आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड आणि राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्याच्या घडीला मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईत पावसामुळे जनजवीन पूर्णपणे विस्कळीत होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन ठप्प झाली आहे. तर जोगेश्वरीतून एक हृदय हेलावणारी बातमी समोर येत आहे. जोगेश्वरीत मॅनहोलमध्ये एक महिला पडल्याची माहिती समोर येत आहे. जोगेश्वरीच्या सिप्झजवळ ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांकडून महिलेचा शोध घेतला जातोय.

मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यामुळे कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याण तालुक्यातील कांबा परिसरातील ही घटना घडली आहे. दगड खदाणीत काम करताना दोन कामागराचा वीज पडून मृत्यू झाला आहे. राजन यादव, बंदणा मुंडा अशी कामगारांची नावे आहेत. टिटवाळा पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू सुरु आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्ये रेल्वेची वाहतूक अजून देखील विस्कळीत आहे. सायन, कुर्ला, घाटकोपर परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या दरम्यान बराच वेळ लोकल ट्रेन थांबल्यामुळे अनेक महिला रेल्वेच्या डब्यातून उतरून पायी चालत गेल्या. यावेळी इतरांनीदेखील तोच पर्याय अवलंबला. कुर्ल्याला पोहचण्यासाठी अनेक प्रवासी रुळावरून चालत स्थानकाकडे जात आहेत.

मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी भरलं आहे. पवई-जेवीएलआर रोडवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईतील पावसाचा मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून कंट्रोल रूम मधून आढावा घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कंट्रोल रूममधून आयुक्तांकडून ठिकठिकाणी पाऊस सुरू असल्याचा आढावा घेतला जात आहे.

मुंबईत आज (२५ सप्टेंबर २०२४) सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आलेले केंद्र पुढीलप्रमाणे. (नोंद मिलिमीटरमध्ये)

  • पासपोली पवई महानगरपालिका शाळा (पवई) – २५७.८
  • मानखुर्द अग्निशमन केंद्र – २३९.६
  • एन विभाग कार्यालय- २३३.१
  • नूतन विद्यामंदिर – २३१.८
  • टागोर नगर महानगरपालिका शाळा (विक्रोळी) – २२७.६
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर केंद्र, जोगेश्वरी – १८०
  • मरोळ अग्निशमन केंद्र- १५४.६
  • मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (अंधेरी) – १५०
  • शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा – १३९.२
  • के पूर्व विभाग कार्यालय – १२६.२
  • नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा – १२५.८
  • पी दक्षिण विभाग कार्यालय – १२३.९
  • प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा, शीव (सायन) – ११६.६
  • कुलाबा उदंचन केंद्र – ११४.३

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार
गणेशोत्सवापूर्वी भगवा सप्ताहामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्या माध्यमातून शिवसैनिकांनी पक्षाचे मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवले....
Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
Latur News – मराठा आरक्षणासाठी पती-पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज
छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली, मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल