शांताराम मोरेंविरोधात जोरदार फिल्डिंग; मिंधेंविरोधात भिवंडी ग्रामीण विधानसभेत भाजपची मोर्चेबांधणी

शांताराम मोरेंविरोधात जोरदार फिल्डिंग; मिंधेंविरोधात भिवंडी ग्रामीण विधानसभेत भाजपची मोर्चेबांधणी

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपचे कपिल पाटील विजयी झाले होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दारुण पराभव केला. पराभवाची ही धूळ मिंधे गटामुळेच चाखावी लागल्याची सल भाजप नेत्यांमध्ये असून त्याचे उट्टे येत्या विधानसभा निवडणुकीत काढण्याची रणनिती आखली आहे.

मिंधे गटाचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांची कोंडी करण्यासाठी भाजपने स्नेहा पाटील यांचे पद्धतशीरपणे ब्रेण्डिग सुरू केले आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली संपूर्ण भिवंडी ग्रामीणमध्ये तशी बॅनरबाजीच केली आहे. त्यामुळे खोक्यांसाठी गद्दारी केलेल्या शांताराम मोरेंची चांगलीच गोची झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत मिंधे, भाजप गटाकडून कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवली. तर विद्यमान खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत शिवसेनेची ताकद मिळाल्याने सुरेश म्हात्रे यांनी दिल्ली गाठली.

मिंधे गटाची या मतदारसंघात ताकद नसल्यानेच याचा फटका कपिल पाटील यांना बसल्याचा दावा काही भाजप नेत्यांनी केला आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते मिंध्यांची नसून भाजपची असल्याचे मतही व्यक्त केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण मतदारसंघ खेचून घेण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या या कोंडीने मिंधे गटाचे शांताराम मोरे चांगलेच गॅसवर गेले आहेत.

‘लाडकी बहीण’ समितीवर नियुक्ती

स्नेहा पाटील या काल्हेर गावच्या माजी सरपंच असून भाजपने त्यांना प्रोजेक्ट करण्याकरिता ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी विधानसभा निहाय नेमलेल्या समितीवर नियुक्त केले आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील या नियुक्तीनंतर संपूर्ण तालुकाभर त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. स्नेहा पाटील यांच्या आडून या मतदारसंघावर दावा ठोकण्याचा छुपा अजेंडाच भाजप नेत्यांचा असल्याची भीती मिंध्यांच्या स्थानिक नेत्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांचे पडघम जसे वाजू लागतील तसतसे या मतदारसंघात भाजप व मिंधे गटात वादाचे फटाके फुटणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब (एमजेएससी) व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सीफेस म्युनिसिपल शाळेचा रेहान शेख विजेता...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार
Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
Latur News – मराठा आरक्षणासाठी पती-पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज