राहुल गांधी यांची एटीएसमार्फत चौकशी करा, गुणरत्न सदावर्ते यांनी का बरं केली मागणी

राहुल गांधी यांची एटीएसमार्फत चौकशी करा, गुणरत्न सदावर्ते यांनी का बरं केली मागणी

राहुल गांधी अमेरिकन दौऱ्यावर होते. तिथल्या विद्यापीठात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अनेक प्रश्न आणि मुद्यांवर त्यांनी त्यांची मतं मांडली. त्यावरुन देशात एकच वादंग उठले. काही प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तरांनी त्यांच्या मित्रपक्षांना पण अडचणीत आणले. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. आता गांधी यांच्याविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मोर्चा उघडला आहे. राहुल गांधी यांची एटीएसकडून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

त्यांना पूर्वीपासूनच आरक्षणाची मिरची

गांधी कुटुंबियांची ख्याती आहे त्यांच्या डोक्यात कधीच संविधान नाही. आरक्षणाची मिरची गांधी कुटुंबियांना खूप आधीपासून लागली आहे. बालिश स्वरूपाचे वक्तव्य गांधी यांनी केले आहे. ते इला उमर हिला राहुल गांधी भेटतात, जी अतिरेकी महिला आहे. विदेशात राहुल गांधी हे तिच्यासोबत काय चर्चा करतो? शीख समुदायाचे नाही तर इतर समाजासाठी केलेलं भाष्य हे अराजकता माजवणारा आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

राहुल गांधी यांची चौकशी करा

त्यांनी केलेलं वक्तव्य हे देशद्रोही वक्तव्य आहे. समानतेच्या तत्त्वावर राहुल गांधी बोलले नाही… राहुल गांधी अपरिपक्व आहे. त्यांचं हे बोलणं असंविधानिक आहे. ATS सारख्या संस्थेने राहुल गांधी यांच्या बाबतीत चौकशी करावी आणि त्यांना अटक करावे. आम्ही त्यांच्या विरोधात आज तक्रार दाखल केली आहे, असे सदावर्ते यांनी स्पष्ट केले.

ते तर भाईजान

संजू आणि उद्धव काही हिंदुत्ववादी नाही. ते भाईजान वाले आहेत, अशी टीका त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली. संजू आणि सुषमा ताई यांना पोलीस शिपाई करायला पाहिजे. कारण ते पोलीस तपासात हस्तक्षेप करतात. संजू बाबा सुप्रीम कोर्टावर बोलतात, या विरोधात गुन्हा दाखल झाल्यास 6 महिन्याची शिक्षा होईल. सुषमा अंधारे यांच्यावर देखील कारवाई होईल कारण त्या पोलीस कारवाई हस्तक्षेप करतात. डंके की चोट पे सांगतो की मामूजान तुम्हाला किंमत मोजावी लागेल, असे सदावर्ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी खलबतं सुरू आहेत. महायुतीत तर या पदावरून रस्सीखेच...
परिणीती चोप्रा हिने शेअर केला राघव चड्ढा याच्यासोबतचा ‘तो’ खास व्हिडीओ, अभिनेत्रीने पोस्टमध्ये थेट…
चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थानला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
दर्शनाला चाललेल्या कुटुंबाच्या रिक्षाला ट्रकची धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री व्हायचंय, पण गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच अडकते, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
अंत्यसंस्काराठी स्मशानात तिरडी घेऊन जाताना ग्रामपंचायतीचा निषेध, वाढवणा खुर्द येथील घटना
भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला – विजय वडेट्टीवार