अजिंठा वेरूळ-चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर

अजिंठा वेरूळ-चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर

ऑस्कर नामांकित लगान, स्वदेस, जोधा अकबर, पानिपत यांसारख्या अनेक महत्वपूर्ण चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माते आशुतोष गोवारीकर यांची दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी नियुक्ती व फेस्टिवल डायरेक्टरपदी चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम यांनी दिली.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशनच्या वतीने सदरील महोत्सव केंद्र सरकारचे सूचना व प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी व महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहकार्याने संपन्न होतो. 15 ते 19 जानेवारीदरम्यान होणाऱ्या महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर करण्यात आली आहे. गोवारीकर यांनी आपल्या अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती प्रक्रियेद्वारे सिनेजगतात तीन दशकांहून अधिक काळापासून उल्लेखनीय योगदान दिले आहे. जगभरातील सर्वच महत्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये विशेष सहभाग तसेच अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अॅण्ड सायन्स यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांसाठी मतदान सदस्य म्हणून देखील ते कार्यरत आहेत.

अध्यक्षपद हा बहुमान -गोवारीकर
या नियुक्तीबाबत गोवारीकर म्हणाले की, अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदाची जबाबदारी एक बहूमान समजतो. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, फेस्टिवल डायरेक्टर सुनील सुकथनकर, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग या सृजनशील दिग्दर्शकांच्या जोडीने अत्यंत चांगली कलात्मक प्रक्रिया यानिमित्ताने घडवता येईल याचा मला विशेष आनंद आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक लौकिक असलेल्या छत्रपती संभाजीनगर हा अतिशय सकस उर्जेने भारलेला संपूर्ण प्रदेश आहे. अशा ठिकाणी दर्जेदार जागतिक चित्रपट रसिकांसमोर आणल्याने नव्या प्रतिभेला जन्म देण्यास मदत होईल व त्यांच्या सृजनाला जगासमोर आणता येईल. यानिमित्ताने अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मला योगदान देता येईल याचा मला विशेष आनंद आहे.

फेस्टिव्हल डायरेक्टर पदाचा पदभार दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी नुकताच स्विकारला आहे. माजी संचालक अशोक राणे यांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाल्याने सुनील सुकथनकर यांची निवड करण्यात आलेली आहे. सुकथनकर यांनी मागील तीन दशकांपासून मराठी सिनेसृष्टीत अतिशय उल्लेखनीय योगदान त्यांच्या सिनेमांच्या माध्यमातून दिलेले असून दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्यासोबत त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे. देशभरातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये सुकथनकर यांनी ज्युरी अध्यक्ष व ज्युरी सदस्य या नात्याने काम केलेले आहे.

या नियुक्तीबद्दल प्रसिध्द नाट्य चित्रपट दिग्दर्शक व महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, नीलेश राऊत, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, दीपिका सुशीलन यांच्यासह सर्व संयोजन समितीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब (एमजेएससी) व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सीफेस म्युनिसिपल शाळेचा रेहान शेख विजेता...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार
Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
Latur News – मराठा आरक्षणासाठी पती-पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज