Hindu Mandir Vandalized: अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला, भिंतींवर लिहला हिंदूंसाठी धमकीवजा संदेश

Hindu Mandir Vandalized: अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला, भिंतींवर लिहला हिंदूंसाठी धमकीवजा संदेश

अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये BAPSच्या श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. मागच्या दहा दिवसातली ही दुसरी घटना आहे. एवढेच नाही स्वामीनारायण मंदिरामध्ये हिंदूंनो परत जा असे हिंदू विरोधी नारेही लिहीले आहेत. या घटनेमुळे तेथील हिंदूंमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना कॅलिफोर्नियाची राजधानी सॅक्रामेंटोची आहे. कट्टरपंथियांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. न्यूयॉर्कमध्येही स्वामी नारायण मंदिरात अशी घटना घडली होती. याप्रकारे अमेरिकेमध्ये हिंदूविरोधात तेढ वाढत आहे.

या घटनेची माहिती स्वामी नारायण मंदिराकडून सोशल मीडिया एक्सवर दिली आहे. मंदिराकडून लिहिण्यात आले की, न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिरावर हल्ल्याच्या 10 दिवसानंतर ही दुसरी घटना आहे. ज्यावेळी कॅलिफोर्नियाचे सॅक्रामेंटोमध्ये स्वामीनारायण मंदिरावर हल्ला झाला आहे. दरम्यान हिंदूंनो परत जा..असा धमकीवजा संदेश लिहिण्यात आला आहे. हिदूस्थानच्या दूतावासाकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या या घटनेबाबात एका हिंदू संघटनेकडून निवेदन जारी केले आहे.

सॅक्रामेंटोच्या स्थानिय संस्थानीही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मंदिराची तोडफोड केली, त्याचबरोबर पाइपलाइनही कापली आहे. या तोडफोडीनंतर मोठ्या संख्येने मंदिरात लोकं पूजेसाठी पोहोचले होते.  याआधी 16 सप्टेंबरला न्यूयॉर्कमधील मंदिरावर हल्ला झाला होता. त्यानंतरही मंदिराचे नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हिंदुस्थानविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या. या हल्ल्यात खलिस्तानचा हात असल्याचे मानले जात होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब (एमजेएससी) व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सीफेस म्युनिसिपल शाळेचा रेहान शेख विजेता...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार
Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
Latur News – मराठा आरक्षणासाठी पती-पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज