गणपती पावला..नऊ वर्षांनंतर एसटी फायद्यात, ऑगस्ट महिन्यात मिळाले इतके उत्पन्न…

गणपती पावला..नऊ वर्षांनंतर एसटी फायद्यात, ऑगस्ट महिन्यात मिळाले इतके उत्पन्न…

कोरोना नंतर एसटी महामंडळाचा गाडा तोट्याच्या गाळात रुततच चालला होता. परंतू यंदाच्या उत्सवी हंगामात नऊ वर्षानंतर प्रथमच एसटी फायद्यात आली आहे. तब्बल ९ वर्षांनंतर एस.टी.महामंडळ पहिल्यांदाच ऑगस्ट २०२४ मध्ये १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये फायद्यात आले असल्याचे एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे एसटी महामंडळात आनंदाचे वातावरण आहे. एकतर गणपती सणाच्या तोंडावर केलेल्या आंदोलनानंतर एसटी महामंडळाला सहा हजार रुपये मूळ वेतनात वाढ मिळाली आहे. त्यात नेहमीच तोट्यात असलेली एसटी संपूर्ण ऑगस्ट महिन्यात फायद्यात राहीली आहे.

एसटी महामंडळ गेली अनेक वर्षे तोट्यात होते. साल २०१५ शेवटचे फायद्यात आले होते. त्यानंतर मात्र एसटी महामंडळाचा तोटा वाढतच गेला होता. एसटी महामंडळाला कोरोना काळ तर अत्यंत वाईट गेला. एसटीच्या गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच १८  हजाराचा बसगाड्यांचा ताफा १६ हजारावर आल्याने एसटीचा तोटा वाढला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप प्रचंड लाबल्याने सर्व हंगाम वाया गेल्याने एसटीचा तोटा वाढतच गेला. त्यामुळे एसटीची अवस्था अत्यंत बिकट होत गेली. परंतू नवीन सरकार येताच एसटी ७५ वर्षांच्या ज्येष्ठांना मोफत प्रवासाची योजना एसटीच्या कामी आली. आणि शासनाकडून प्रतिपूर्ती रक्कम मिळू लागल्याने एसटीने पुन्हा बाळसे धरले. यानंतर एसटीतून महिलांना अर्धे तिकीट आकारण्याच्या योजनेनंतर प्रचंड फायदा झाला. कारण एसटीची रोडावलेली प्रवासी संख्या पु्न्हा वाढू लागली. त्यामुळे एसटीला सरकारकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्ती रकमेमुळे एसटी फायद्यात येऊ लागली.

२० विभागांनी नफा कमवला

ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल ९ वर्षांनी, ऑगस्ट-२०२४ मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आल्याने  उपाध्यक्ष आणि  व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

एसटीची अनोखी भरारी

कोरोनाकाळापूर्वी एसटीला दररोज 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. या उत्पन्नात कोरोना काळात प्रचंड घट झाली. परंतू एसटीचे प्रवासी आता वाढत चालल्याने एसटीचे उत्पन्न देखील वाढत असल्याने एसटी फायद्यात आली आहे. तसेच साल 2015 नंतर एसटी मध्यंतरी अनेकदा फायद्यात आली होती. परंतू त्यात एसटी महामंडळाला सातत्य राखता आले नाही. आता मात्र हा संपूर्ण ऑगस्ट महिना एसटी मोठा लाभ झाला असल्याचे एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. एसटी गणपती स्पेशल गाड्यांमुळे दोन लाख चाकरमानी यंदा कोकणात रवाना झाले. त्यानंतर आता परतीच्या प्रवास देखील एसटीला नव्या शिखरावर पोहचविणार आहे. एसटी आता साध्या टु बाय टु आसनाच्या अशोक लेलॅण्ड कंपनीच्या बसेस देखील टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहेत. या बसेस लांबपल्ल्याच्या मार्गासाठी उत्तम ठरणार आहेत. त्यामुळे एसटी उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील आरटीओच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका, वाहनविषयक कामे रखडली राज्यातील आरटीओच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका, वाहनविषयक कामे रखडली
राज्यातील आरटीओंनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल 24 सप्टेंबरपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे.त्यामुळे राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांचे कामकाज ठप्प झालेले...
लहानपणापासूनच आलिया भट्ट हिला ‘हा’ गंभीर आजार, अभिनेत्रीने म्हटले लग्नात…
एअरपोर्टवर क्लासी लूकमध्ये रेखा, अभिनेत्रीचा ‘तो’ लूक पाहताच…
आपल्या किडनीची योग्य देशभाल कशी कराल? एक्सपर्ट डॉ. राहुल गुप्ता काय सांगतात?
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला
परिणीती चोप्रा हिने शेअर केला राघव चड्ढा याच्यासोबतचा ‘तो’ खास व्हिडीओ, अभिनेत्रीने पोस्टमध्ये थेट…
चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थानला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल