Akshay Shinde Encounter – नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? मग बाकीच्या दोन गोळ्या कुठे गेल्या? हायकोर्टाचे पोलिसांना सवाल

Akshay Shinde Encounter – नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? मग बाकीच्या दोन गोळ्या कुठे गेल्या? हायकोर्टाचे पोलिसांना सवाल

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवरून पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. तसेच अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी झाली. या सुनावणीत हायकोर्टाने पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? चार पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला हे समजणं थोडं कठीण जातंय. रिव्हॉल्व्हर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे का? असे सवाल हायकोर्टाने सुनावणीदरम्यान केले.

एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमध्ये अक्षय हा एकटा आरोपी होता. आरोपीला दुसरीकडे घेऊन जाताना तो आक्रमक होईल अशी कोणतीही लक्षणे त्याच्याकडे नव्हती. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? की हातावर किंवा पायावर मारता? त्या गाडीत जे पोलीस अधिकारी होते ते पूर्णपणे प्रशिक्षीत आणि पारंगत होते. अशा चार व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर एक अधिकारी ज्याने अनेक एन्काऊंटर यशस्वी केले आहेत, अशा पोलीस अधिकाऱ्यासमोर तो एकटा आरोपी वरचढ ठरून पोलीस अधिकाऱ्यांचे पिस्तुल हिसकावून गोळीबार कसे काय करेल ? असे सवाल हायकोर्टाने पोलिसांना केला.

अक्षय शिंदेला पोलीस व्हॅनमधून नेत असताना पिस्तुल लॉक का केले नव्हते? पोलिसांनी एवढा निष्काळजीपणा कसा केला? आरोपीने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक पोलिसाला लागली, असे तुम्ही सांगता मग बाकीच्या दोन गोळ्या कुठे गेल्या? असा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत हायकोर्टाच्या खंडपीठाने सरकारी वकिलांना धारेवर धरले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण… कोर्टात नेमकं काय घडलं? 10 महत्त्वाचे मुद्दे काय? अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण… कोर्टात नेमकं काय घडलं? 10 महत्त्वाचे मुद्दे काय?
Akshay Shinde Encounter Hearing IMP : बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर...
पोलिसांनी जाणूनबुजून एन्काऊंटर केलं असेल तर डबल अभिनंदन; असं का म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटरचा व्हिडिओ जतन करा, सर्व सीडीआर काढा…कोर्टाचे आदेश
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला? गूढ उकलणार? कोर्टाने राज्य सरकारला दिलेला महत्त्वाचा आदेश कोणता?
Sharmila Thackeray : महिलांवरील अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का? शर्मिला ठाकरेंचा थेट सवाल
‘या’ गोष्टी सादर करा… अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने राज्य सरकारकडे काय काय मागितले?
सिनेमांमध्ये काम नाही, तरीही कोट्यवधींची माया कमावते उर्मिला मातोंडकर, जगते रॉयल आयुष्य