ऐकावे ते नवलच! बँक लॉकरही बेभरवशाचे; अडीच कोटींचे दागिने गायब, पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकासह पाचजणांविरुद्ध गुन्हा

ऐकावे ते नवलच! बँक लॉकरही बेभरवशाचे; अडीच कोटींचे दागिने गायब, पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकासह पाचजणांविरुद्ध गुन्हा

बँक खातेदाराचे लॉकर परस्पर उघडून दोन कोटी 65 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकरमधील दागिन्यांसह साडेनऊ लाखांची रोकड, महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची तक्रार खातेदाराने दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक नयना अजवानी, सुरेंदर शहानी, तसेच सराफी पेढीचे मालक सतीश पंजाबी यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यश केशवलाल कपूर (वय 46, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लष्कर भागातील ‘अरोरा टॉवर्स’ इमारतीत पंजाब नॅशनल बँकेची शाखा असून, कपूर यांनी दागदागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. दोन महिन्यांपूर्वी लॉकर उघडून तपासणी केली असता, लॉकरमध्ये हिरेजडित दागिने, रोकड सुस्थितीत होती. 6 सप्टेंबरला ते पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेले. तेव्हा 13 ऑगस्ट रोजी बँक व्यवस्थापक अजवानी, शहानी यांनी परवानगी न घेता कपूर यांचे लॉकर उघडल्याची माहिती मिळाली. शहानी यांनी इतरांच्या मदतीने तीन ते चार वेळा प्रयत्न करून लॉकर उघडले. त्यातील हिरेजडित सोन्याचे दागिने, रोकड, महत्त्वाची कागदपत्रे पूर्वसूचना न देता काढून घेण्यात आल्याचे कपूर यांना समजले.

बँकेने नियमांचे पालन न करता व्यवस्थापकाने लॉकर उघडले. लॉकरमधील दोन कोटी ६५ लाख रुपयांचे दागिने सराफ सतीश पंजाबीला दिले. त्यानंतर पंजाबीने दागिने परस्पर वितळविले. पुरावा नष्ट करण्यासाठी दागिने वितविळण्यात आल्याचे कपूर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ-२च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी बँकेस भेट दिली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, एपीआय विशाल दांडगे तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : ‘बदला पुरा’.. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, मविआला डिवचलं Akshay Shinde Encounter : ‘बदला पुरा’.. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, मविआला डिवचलं
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी मृत्यू झाला. पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी...
एकतर्फी प्रेमामुळे Urmila Matondkar चं करिअर संपुष्टात, ‘या’ पुरुषापासून वाचण्यासाठी घेतला मोठा निर्णय
10 वर्षांनी लहान काश्मिरी मुस्लिमशी निकाह, धर्मांतराच्या चर्चा; अशी सुरू झाली उर्मिला-मोहसिनची लव्ह स्टोरी
दुर्गा जसराजला मातृशोक, पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांचे निधन
Urmila Matondkar: लग्नाच्या 8 वर्षांनंतर उद्ध्वस्त होणार उर्मिलाचा संसार, नवऱ्याला देणार घटस्फोट!
बिग बॉसच्या घरात शिवरायांचा जयजयकार का केला नाही? अखेर अरबाज पटेलने दिलं उत्तर
बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट