जगभरातील महत्वाच्या घडामोडी

जगभरातील महत्वाच्या घडामोडी

आंध्रात सर्व ब्रँडची दारू फक्त 99 रुपयांत

आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू सरकारने तळीरामांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारने मद्याच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे तळीरामांना कोणत्याही ब्रँडची 180 एमएलची दारू अवघ्या 99 रुपयांत मिळू शकणार आहे.

पवन कल्यान यांच्याकडून मल्लेश्वर मंदिराची स्वच्छता

आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती वेंकटेश्वर बालाजी मंदिरात लाडू प्रसादाच्या वादानंतर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांनी विजयवाडा येथील दुर्गा मल्लेश्वर स्वामी मंदिरात स्वच्छता मोहीम केली. झालेल्या प्रकाराबद्दल 11 दिवसांचे प्रायश्चित करून देवाकडे क्षमा मागणार असल्याचे पवन कल्याण यांनी म्हटले आहे. प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्याची चरबी आढल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.

हिंदुस्थानची युद्धनौका आयएनएस तलवार केनियात

हिंदुस्थानी नौदलाची फ्रंटलाईन स्टील्थ युद्धनौका आयएनएस तलवार मंगळवारी केनियाच्या मोम्बासा बंदरावर पोहोचली. दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ करणे, एकमेकांचा विकास करण्यासाठी मदत करणे, हा या दौऱ्यामागील उद्देश आहे. आयएनएस तलवार ही युद्धनौका मुंबईच्या नौदलाच्या ताफ्यातील असून कॅप्टन जीतू जॉर्ज यांच्यासह जवळपास 300 कर्मचारी या युद्धनौकेवर आहेत.

सुनीता विल्यम्स यांच्या हाती स्पेस सेंटरची धुरा

एकीकडे सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे अंतराळात सुनीताकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सुनीताला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे प्रमुख करण्यात आले आहे.  5 जून 2024 पासून सुनीता विल्यम्स अंतराळवीर बूच विल्मोर यांच्यासह स्पेस स्टेशनमध्ये आहे. यासंबंधी स्पेस स्टेशनवर लहानसा कार्यक्रमदेखील झाला. अंतराळात 374 दिवस राहिल्यानंतर ओलेक कोनोनेंका, निकोलाई चुब आणि अमेरिकेची अंतराळवीर ट्रेसी सी डायनस हे तिघे पृथ्वीवर परतले आहेत. डायसन सहा महिने अंतराळात राहिली. याआधी 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2012 साली सुनीता विल्यम्सने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर ही धुरा पुन्हा सुनीताकडे आली आहे.

कोल्डप्लेमुळे पंचतारांकित हॉटेलच्या भाडय़ात वाढ

मेक माय ट्रिपच्या माहितीनुसार, डी. वाय. पाटीलजवळील कोर्टयार्ड, बाय, मेरियट, ताज, विवांता या हॉटेल्समध्ये कोणत्याही रूम उपलब्ध नाहीत. सर्व हॉटेल्स फुल्ल झाले आहेत. या ठिकाणी हॉटेलसाठी तीन दिवसांसाठी 2.45 लाख रुपये आकारले जात आहेत, तर जवळच्या हॉटेलमधील एका रुमसाठी 2 लाख रुपये आकारले जात आहेत. पंचतारांकित हॉटेलसाठी 4.45 लाख रुपयांपर्यंत चार्ज आकारले जात आहे. साधारण हॉटेलमध्ये थांबण्यासाठी एका रात्रीसाठी 7 हजार रुपये ते 30 हजार रुपयांपर्यंत चार्ज आकारले जात आहेत.

आयफोन 16’ची जोरदार विक्री

हिंदुस्थानात ‘आयफोन 16’ सीरीज आल्यानंतर 20 सप्टेंबर  रोजी मुंबई आणि दिल्लीतील ऍपल स्टोअरमध्ये  आयफोन खरेदी करणार्यांची मोठी रांग लागली होती. ऍपल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी विक्रीमध्ये वाढ झाली आहे. आयफोन 16 सीरीजने नवा रेकॉर्ड केलाय. गेल्यावर्षी आलेल्या आयफोन 15 च्या तुलनेत आयफोन 16 ची विक्री पहिल्या दिवशी अंदाजे 25 टक्क्यांहून अधिक आहे. काऊंटर पॉईंड रिसर्चच्या रिपोर्टनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लसची विक्री 20 टक्के अधिक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अक्षयने आधी शिवी दिली, मग हवालदार तावडेंच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या…एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी सांगितले नेमके काय घडले? अक्षयने आधी शिवी दिली, मग हवालदार तावडेंच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या…एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी सांगितले नेमके काय घडले?
बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर सोमवारी करण्यात आले. त्यानंतर राज्यात सत्ताधारी अन् विरोधक समोरासमोर आले...
रॅम्प वॉकदरम्यान ऐश्वर्या रायसोबत घडलं असं काही..; अभिनेत्रीच्या आत्मविश्वासाचं होतंय कौतुक
हिंमतसुद्धा करू नका..; तिरुपती लड्डू वादाची खिल्ली उडवणाऱ्या अभिनेत्यावर भडकले पवन कल्याण
वीज कर्मचारी आज, उद्या संपावर जाणार
परतीच्या पावसाने नगर जिल्हय़ाला झोडपले! नगर, पारनेर, राहुरी तालुक्यांत पाऊस; सरासरी 129 मि.मी. पावसाची नोंद
सहकारी संस्था संपवण्याचे घातक राजकारण खेळले जात आहे, शरद पवार यांची टीका
पश्चिम रेल्वेत 5066 शिकाऊ पदांसाठी भरती