“शब्द मागे घेते, मी आता कलाकारच नाही तर…”, शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या कंगनाला उपरती

“शब्द मागे घेते, मी आता कलाकारच नाही तर…”, शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या कंगनाला उपरती

 

शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार कंगना रणौतला अखेर उपरती झाली असून तिने आपले शब्द मागे घेतले आहेत. कंगनाने या संदर्भात एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तिने आपण कृषी कायद्यासंदर्भात पक्षासोबत उभी असून शेतकरी आंदोलनासंदर्भात वापरलेले शब्द मागे घेते असे म्हटले आहे.

कंगना रणौत हिने काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. शेतकरी आंदोलनादरम्यानच अनेक हत्या आणि बलात्कार झाल्याचे ती म्हणाली होती. यानंतर तिला पक्ष नेतृत्वाकडून दट्ट्या पडला होता. भाजपने एक पत्रक जारी करत कंगनाने केलेल्या विधानाशी पक्षाचा संबंध नसून तिच्या मताशी पक्ष सहमत नसल्याचे स्पष्ट केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिनेमांमध्ये काम नाही, तरीही कोट्यवधींची माया कमावते उर्मिला मातोंडकर, जगते रॉयल आयुष्य सिनेमांमध्ये काम नाही, तरीही कोट्यवधींची माया कमावते उर्मिला मातोंडकर, जगते रॉयल आयुष्य
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मिला पती मोहसिन अख्तर...
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही अरबाजला निक्कीची आठवण; गर्लफ्रेंडने उचललं मोठं पाऊल
पतीला दहशतवादी, पाकिस्तानी म्हणणाऱ्यांना उर्मिता मातोंडकरने दिलं होतं सडेतोड उत्तर
लग्नाच्या 8 वर्षांनंतरही उर्मिला मातोंडकर नाही झाली आई, ‘या’ कारणामुळे अनेकांनी मारले टोमणे
अन् घोडा नवरदेवाला घेऊन पळाला; सूरज चव्हाणने सांगितलेला किस्सा वाचून पोट धरून हसाल
बदलापूर आरोपीच्या एन्काऊंटरचा आदेश दिला होता का? सचिन सावंत यांचा श्रेय घेणाऱ्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सवाल
Akshay Shinde Encounter – नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? मग बाकीच्या दोन गोळ्या कुठे गेल्या? हायकोर्टाचे पोलिसांना सवाल