ट्रेनच्या एसी कोचमध्येच ‘टप टप बरसा पानी…’; प्रवाशांनी व्यक्त केला संताप

ट्रेनच्या एसी कोचमध्येच ‘टप टप बरसा पानी…’; प्रवाशांनी व्यक्त केला संताप

जबलपूरहून निजामुद्दीनला जाणाऱ्या जबलपूर-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या एक्स्प्रेसच्या छतावरून पाणी टपकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे रेल्वेतील प्रवासांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान जबलपूर- निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या लोकांनी रेल्वे प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच यावेळी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्रेन क्रमांक 22181 जबलपूर-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एम-3 मध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी ट्रेनच्या छतावरून पाणी टपकत असल्याची तक्रार दिली. प्रवाशांनी याचा व्हिडिओही बनवून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी झाशी स्थानकावरील फलाटावर पोहोचले. यानंतर अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी रेल्वेतील डब्ब्यांची व्यवस्थित पाहणी केली. आणि रेल्वेच्या इतर तुटींचीही नोंद करण्यात आली. यानंतर रेल्वे आपल्या इच्छित स्थळी रवाना करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिनेमांमध्ये काम नाही, तरीही कोट्यवधींची माया कमावते उर्मिला मातोंडकर, जगते रॉयल आयुष्य सिनेमांमध्ये काम नाही, तरीही कोट्यवधींची माया कमावते उर्मिला मातोंडकर, जगते रॉयल आयुष्य
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मिला पती मोहसिन अख्तर...
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही अरबाजला निक्कीची आठवण; गर्लफ्रेंडने उचललं मोठं पाऊल
पतीला दहशतवादी, पाकिस्तानी म्हणणाऱ्यांना उर्मिता मातोंडकरने दिलं होतं सडेतोड उत्तर
लग्नाच्या 8 वर्षांनंतरही उर्मिला मातोंडकर नाही झाली आई, ‘या’ कारणामुळे अनेकांनी मारले टोमणे
अन् घोडा नवरदेवाला घेऊन पळाला; सूरज चव्हाणने सांगितलेला किस्सा वाचून पोट धरून हसाल
बदलापूर आरोपीच्या एन्काऊंटरचा आदेश दिला होता का? सचिन सावंत यांचा श्रेय घेणाऱ्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सवाल
Akshay Shinde Encounter – नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? मग बाकीच्या दोन गोळ्या कुठे गेल्या? हायकोर्टाचे पोलिसांना सवाल