एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !

एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !

एसटी महामंडळाने उत्पन्न वाढविण्यासाठी जास्तीत जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.त्यासाठी प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करुन अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना उद्दिष्टांपेक्षा वाढीव उत्पन्नापैकी 20 टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना सम प्रमाणात वाटण्यात येणार आहे. सदर रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.

एसटी महामंडळाने आपले उत्पन्न वाढावे म्हणून विविध उपयोजना आणि अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. ‘प्रवासी राजा दिन’, ‘कामगार पालक दिन’ यासारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्यक्ष प्रवासात प्रवाशांना अडचण आल्यास आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक बसमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. याबरोबरच तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त केले आहेत. इंधन बचतीसाठी चालक आणि यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळाने ऑगस्ट,2024 या महिन्यात 16 कोटी 86 लाख,61 हजार रुपये नफा मिळवला आहे.उत्पन्न वाढीत सातत्य राहण्यासाठी चालक-वाहक हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून त्यांची कामगिरी चांगली व्हावी, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यंत आवश्यक आहे.हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना महामंडळाने सुरू केली आहे.

अवैध मार्गाचा वापर केल्यास पाणी सोडावे लागणार

विशेष म्हणजे, प्रवासी तक्रार, प्रवाशांशी केलेली गैरवर्तणुक अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास संबंधित एसटी चालक-वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही. असेही, महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे योग्य कामगिरी करणाऱ्या चालक-वाहकांना रोख स्वरुपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही योजना पुढे चालू ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर
या आठवड्यात प्रिया बापटने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. अलीकडेच तिची सिरिज ‘रात जवान है’ चा...
ना हिंदू ना मुस्लिम, सबा आझाद हिच्याकडून धर्माबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, माझे…
विठुरायाच्या टोकन दर्शनाचा मार्ग मोकळा; तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन रांगेची अद्यावत व्यवस्था
बदलापूर प्रकरणातील आरोपीचे कोणीही समर्थन केले नाही, स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न : नाना पटोले
योजनेच्या नावाखाली ग्रामस्थांचे फोटो घेतले, भाजपने आंदोलनाच्या बॅनरवर चिकटवले
Photo – गुलाबी रंगाच्या काश्मीरी सूटमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अंदाज
Mollywood Me Too – अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, अभिनेते सिद्धीकींविरोधात अरेस्ट वॉरंट जारी