Video : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार नवा खेळ; स्पर्धकांच्या चेहऱ्यांवर लागणार रंग

Video : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार नवा खेळ; स्पर्धकांच्या चेहऱ्यांवर लागणार रंग

‘बिग बॉस मराठी’ चा हा सिझन सतत चर्चेत असतो. या सिझनमधील टास्कही चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील लयभारी खेळ प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो. आताही ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवा खेळ पाहायला मिळणार आहे. यात कोण सांगकाम्य ठरणार अन् कोण मालक? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर ‘टॉप 5’ वरून डीपी आणि निक्कीमध्ये संभाषण झालं आहे. तर अभिजीतच्या मनात मात्र एक खंत आहे. तो ती बोलून दाखवतो.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात बिग बॉसने स्पर्धकांशी संवाद साधत आहेत. या आठवड्यात आपल्यातील काही सदस्य ठरतील सांगकामे आणि उर्वरीत सदस्य ठरतील त्यांचे मालक. मालकांनी सांगितलेली त्यांची वैयक्तिक कामेसुद्धा त्यांना करावी लागतील, असं बिग बॉस सांगतात. या टास्कमुळे आज घरात रंगत येणार आहे. कोण कोणाला काय कामे देणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

डीपी आणि निक्कीचा संवाद

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की, अभिजीत, डीपी आणि अंकिता एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहे. तिकीट टू फिनाले म्हणजे काय टॉप 5, असं निक्की म्हणते. त्यावर डीपी तिला उत्तर देतो. मी तुला टॉप 5 मध्ये पाहतोय, असं तो म्हणतो. त्यावर माझं तुम्हाला सांगणं हे कर्तव्य आहे, असं निक्की म्हणते. जसं तुला वाटतंय ना हा व्यक्ती घरात करतोय काय? कशासाठी आलाय, असं म्हणत डीपी तिला उत्तर देतो. मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतेय तुम्ही काल माझं तिकीट टू फिनाले काढलं…पण त्यासाठी तुम्ही दिलेलं कारण हीच माझी समस्या आहे, असं निक्की त्याला म्हणते.

‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा येत्या 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये मानाची ट्रॉफी पटकावण्यासाठी आजपासून चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. आपल्या खेळाबद्दल सदस्य एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहेत. अभिजीत आणि पॅडीमध्ये बोलणं होतं. अभिजीत त्याची नाराजी बोलून दाखवतो. ज्यावेळी भांडणं होत होती त्यावेळी तुम्ही माझ्या बाजुने कधी बोलला नाहीत. तुमच्यासोबत उभं राहिलं पाहिजे असं मी बोललो होतो. पण आता माझं कोणासोबत भांडण होईल तेव्हा मला हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या लोकांसाठी उभं राहा. त्याची साथ सोडू नका, असं अभिजीत पॅडीला म्हणतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ? मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?
मुंबईच्या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रोच्या पहिल्या बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलं आहे....
नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला, 350 विमाने एकाच वेळी पार्क होणार
एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !
Akshay Shinde Encounter : ड्रायव्हरजवळ बसलेले PI मागे का गेले? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का केला? पोलीस अधिकाऱ्याने सर्व सांगितलं
तिरुपती लाडूच्या वादावरून दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले
Badlapur Protest : आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल
नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात