देव माफ करणार नाही… महिलेला निर्दयीपणे चिरडणाऱ्या मिहीर शाहला कोणी फटकारलं ?

देव माफ करणार नाही… महिलेला निर्दयीपणे चिरडणाऱ्या मिहीर शाहला कोणी फटकारलं ?

राज्यात गेल्या काही महिन्यांत हिट अँड रनची अनेक प्रकरणे उघडकीस आली असून जुलै महिन्यात मुंबईतील वरळी येथे पहाटे एका आलिशान बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरच्या जोडप्याला धडक दिली. या धडकेनंतर खाली पडलेल्या महिलेला कारने फरफटत नेलं. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कावेरी नाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचे पती जखमी झाले. याप्रकरणी मिहीर शाह या कारचालकाला दोन दिवसांनी अटक करण्यात आली. तो शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा मुलगा असल्याचेही समोर आले होते. याप्रकरणाची सध्या सुनावणी सुरू असून त्यादरम्यान हायकोर्टाने मिहीर शाहला फटकारलं.

सुनावणी दरम्यान मिहीरच्या वकिलांनी बचावार्थ युक्तिवाद केला होता. पोलिसांची कारवाई बेकायदा आहे , आरोपीला अटकेचे कारण लेखी स्वरूपात दिलेले नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला होता. ते ऐकून न्यायाधीश संतापले. इथ एका महिलेला निर्दयीपणे चिरडलं आहे. अशा गंभीर गुन्ह्यात आरोपीच्या हक्काच्या गोष्टी का करताय ? तांत्रिक मुद्दे पाहत बसलो तर देव माफ करणार नाही! असे म्हणत न्यायाधीशांनी त्याला फटकारलं.

न्यायाधीशांनी फटकारलं

7 जुलै रोजी मिहीर याने दारूच्या नशेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवली आणि वरळी परिसरात कावेरी नाखवा यांना चिरडले.त्या गाडीखाली आल्याचे पाहूनही त्याने कार थांबवली नाही, उलट वेगाने पुढे नेली, त्यामुळे कावेरीही फरपटत गेल्या. गंभीर जखमी झालेल्या कावेरी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला मिहीर व सहआरोपी राजऋषी विडावतने सुटकेसाठी उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.

त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सोमवारी एकत्रित सुनावणी झाली. यावेळी मिहीरच्या वकिलांनी आरोपीचा हक्क तसेच पोलिसांच्या कारवाईतील तांत्रिक त्रुटींकडे लक्ष वेधले , त्यावर न्यायालयाने फटकारले. पोलिसांची कारवाई बेकायदा आहे , आरोपीला अटकेचे कारण लेखी स्वरूपात दिलेले नाही, असा युक्तिवाद मिहीरच्या वकिलांनी केला

मात्र ते ऐकून न्यायालय संतापले. आरोपीने महिलेला निर्दयीपणे चिरडले. अशा गंभीर गुन्ह्यात आरोपीच्या हक्काच्या गोष्टी कशा करता ? अशा प्रकरणांत तांत्रिक मुद्दे पाहत बसलो तर देव आम्हाला माफ करणार नाही, असे न्यायालयाने मिहीरच्या वकिलांना सुनावले.

नेमंक काय आहे प्रकरण?

मुंबईमधील वरळी येथे सकाळ पहाटे 5 वाजता प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य गाडीवरून चालले होते. ससून डॉक बंदराकडून ते मासे घेऊन येत होते. या दाम्पत्याला बीएमडब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिली. धडक दिलेल्या गाडीमध्ये मिहिर शाह आणि त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. धडक दिल्यावर दाम्पत्य खाली पडले, त्यानंतर कावेरी नाखवा यांना बीएमडब्ल्यूने फरफटत नेलं. प्रदीप नाखवा यांनी सांगितल्यानुसार कावेरी यांनी सी लिंक पर्यंक फरफटत नेलं. त्यांच्या अंगावरील कपडेही फाटले होते. उपचारादरम्यान कावेरी यांचा मृत्यू झाला. वरळीच्या कोळीवाड्यात नाखवा मच्छीमार दाम्पत्य राहत होते. मिहिर शाह हा कार चालवत होता. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून फरार झाला. अथक शोधानंतर दोन दिवसांनी त्याला अटक करण्यात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब
बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित...
‘तुम्हाला पटेल किंवा..’ अरबाजसाठी हेमांगी कवीची पोस्ट, अभिजीत म्हणाला ‘बाज नहीं आओगी तुम’
राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; काय आहे कारण?
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चनचं असं आहे नातं! ‘हा’ व्हिडीओ पुरावा, असं असताना का होतेय घटस्फोटाची चर्चा?
प्राजक्ता माळीने धरला ‘मदनमंजिरी’ गाण्यावर ठेका, अभिनेत्रीच्या लावणीवर चाहते फिदा
आता रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट! नगर – मनमाड रेल्वेमार्गासाठी पढेगाव ते राहुरी चाचणी यशस्वी
…म्हणून शिंदे प्रकरण मुळापासून संपवलं! संजय राऊत यांचा गंभीर आरोप