मोदींसाठी गर्दी जमविण्याचे पदाधिकाऱ्यांना टार्गेट, गुरुवारी पुण्यात विकासकामांचे भूमिपूजन

मोदींसाठी गर्दी जमविण्याचे पदाधिकाऱ्यांना टार्गेट, गुरुवारी पुण्यात विकासकामांचे भूमिपूजन

पुणे शहर भाजपमधील अंतर्गत स्पर्धा यामुळे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात  झालेल्या कार्यक्रमाला गर्दी नव्हती. ही बाब भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे खडबडून जागे होत भाजपने शहरातील व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रेक्षक जमा करण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे.

कर्वेनगर येथे पालखी महामार्ग आणि इतर विकास विषय कार्यक्रमांमध्ये  गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप, महायुती दिग्गजांची फळी व्यासपीठावरती होती. कोथरूड आणि परिसरात कार्यक्रमाची मोठी फ्लेक्सबाजी करण्यात आली होती. परंतु या कार्यक्रमात खरी चर्चा रंगली ती प्रेक्षक नसल्याची अन् जाहिरातबाजी करून नेत्याच्या पुढे न झालेल्या गर्दीची. या कार्यक्रमामध्ये जगन्नाथ महाराज पाटील यांच्या कीर्तन सेवेमुळे वारकरी संप्रदायाने गर्दी केल्यामुळे लाज राखता आली.

आपण थोडक्यात बचावलो, अशी प्रतिक्रिया भाजपमधील जबाबदार शहर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दिली.

z महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या शिवाजी रस्त्यावरील ऐतिहासिक भिडे वाडय़ाचे राष्ट्रीय स्मारक उभारले जात आहे. या कामाचा शुभारंभ यापूर्वीच झालेला आहे. असे असतानाच कामाचे पुन्हा भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला सुसज्ज क्रीडा सुविधा केंद्र उभारण्यासाठी वांद्रे रिक्लेमेशन येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ...
खेळाच्या मैदानावर रुग्णालय उभारण्याच्या निर्णयाला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल; उद्या तातडीची सुनावणी
शाळांमध्ये सीसीटीव्ही, महिला सुरक्षा रक्षक नेमणुकीच्या खर्चासाठी सरकारकडे पाठपुरावा; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आश्वासन
आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युनोच्या महासभेत दावा
‘लाडू’ वादानंतर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण! महाशांती होम, स्वयंपाकघर गोमूत्राने धुतले
छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार
धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, तामीळनाडूच्या राज्यपालांचे विधान