नाटक करू नका… राजकीय करियर खल्लास करीन! मनोज जरांगे यांचा फडणवीसांना इशारा

नाटक करू नका… राजकीय करियर खल्लास करीन! मनोज जरांगे यांचा फडणवीसांना इशारा

‘मी कोणतेही राजकीय भाष्य करत नाही. पण आम्हाला राजकीय भाषा वापरण्यास भाग पाडू नका. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लवकर मान्य करा, नाटक करू नका… नसता राजकीय करियर खल्लास करीन!’ असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. दरम्यान, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे तसेच तलाठी विजय जोगदंड यांनी जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, परंतु ती त्यांनी धुडकावून लावली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सहाव्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून जरांगे यांचे उपोषण सुरू झाले आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. वर्षभरापासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. पण फडणवीसांचे ऐकून सरकार मराठ्यांना मूर्ख बनवत आहे. मराठा आरक्षण बिनबोभाट लागू करा, आता कोणतेही नाटक चालणार नाही. नसता सगळा खेळ खल्लास करीन. विधानसभा निवडणुकीत पाडापाडी झाली तर आम्हाला बोल लावायचा नाही, असे जरांगे म्हणाले.

सध्या उपसरपंचच कारभार करतोय

सध्या सरपंचाच्या हातात काहीच नाही. उपसरपंचाचीच चलती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतील तसा कारभार चालू आहे. पण मराठा आरक्षणात खोडा घालण्याचा प्रयत्न करू नका, विधानसभेत प्रचंड महागात पडेल, असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला.

आंतरवालीकडे येणारा रस्ता बंद

आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू झाल्यानंतर लगेचच ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनही सुरू झाले. मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी आंदोलनासाठी येत असलेले ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना पोलिसांनी वडिगोद्रीतूनच परत पाठवले. त्यामुळे ओबीसींचे आंदोलन होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली. पण मंगेश ससाणे यांनी आपल्या पाच सहकार्‍यांसह उपोषण सुरू केले. सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशांची अंमलबजावणी करू नये, बोगस कुणबी दाखले रद्द करावेत अशी आमची मागणी असल्याचे ससाणे यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही आंदोलनांमुळे गर्दी होण्याच्या भीतीमुळे पोलिसांनी आंतरवालीकडे येणारा रस्ता बॅरिकेड्स लावून बंद केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

KBC 16 : अखेर अमिताभ बच्चन यांच्या ओठावर ती गोष्ट आलीच; बिग बी म्हणाले, ती इच्छा अपुरीच राहिली… KBC 16 : अखेर अमिताभ बच्चन यांच्या ओठावर ती गोष्ट आलीच; बिग बी म्हणाले, ती इच्छा अपुरीच राहिली…
‘कौन बनेगा करोड़पति 16’लाही अत्यंत उदंड प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 24 वर्षापासून महानायक अमिताभ बच्चन हा शो करत आहेत. एवढ्या...
बदलापूर प्रकरणात फरार असलेले सहआरोपी शाळेचे संस्थापक आणि सचिवांना अटक
गृहमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी खराब, सुप्रिया सुळे यांची टीका
Mumbai News – हाजीअली दर्गा उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, हरियाणातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
वाराणसीपाठोपाठ लखनौमध्येही साईबाबा हटाओ मोहीम! अखिल भारतीय हिंदू महासभेचा फतवा
अटल सेतूवरून आणखी एकाची उडी, मानसिक तणावातून व्यावसायिकाने जीवन संपवले
Ind Vs Ban Test Series 2024 – हिंदुस्थानने बांगलादेशवर विजय मिळवताच, रमीझ राजा यांची प्रतिक्रिया चर्चेत