‘भटकंती’मध्ये निसर्गाचा आविष्कार, सुभाष शेगोकार यांचे चित्रप्रदर्शन

‘भटकंती’मध्ये निसर्गाचा आविष्कार, सुभाष शेगोकार यांचे चित्रप्रदर्शन

प्रसिद्ध चित्रकार सुभाष शेगोकार यांचे ‘भटकंती’ हे चित्रप्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन 22 सप्टेंबर दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत पाहता येईल. यामध्ये अ‍ॅक्रॅलिक, जलरंग माध्यमातील चित्रे आहेत.

सुभाष शेगोकार गेली 25 वर्षे आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहेत. वास्तववादी, निसर्गाच्या सान्निध्यातील कलाकृती असे सुभाष शेगोकार यांच्या शैलीचे वर्णन करता येईल. अंबरनाथ येथे राहणारे सुभाष शेगोकार अनेक ठिकाणी भटपंती करून तिथे चित्रे काढतात.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणांना सुभाष शेगोकार भेट देतात ती ठिकाणे, तिथले वातावरण चित्रांच्या माध्यमातून कलारसिकांपर्यंत पोचवतात. ‘भटकंती’ प्रदर्शनात अंबरनाथ, रत्नागिरी, शहापूरचे आदिवासी पाडे, वाराणसी, राजस्थान अशा अनेक ठिकाणची चित्रे आहेत. प्रदर्शन निःशुल्क आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाच वर्षांपासून मुलीवर करत होता अत्याचार, बाप निघाला हैवान पाच वर्षांपासून मुलीवर करत होता अत्याचार, बाप निघाला हैवान
स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱया नराधम बापाला गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने अटक केली. त्याला पुढील कारवाईकरिता...
महायुतीत जागांसाठी अजितदादा गटाची फरफट; तटकरे, पटेल यांचा अमित शहांच्या मागे तगादा
शिवसेनेच्या याचिकेवर नऊ महिन्यांत 16 तारखा; गद्दार आमदारांच्या अपात्रतेचे भिजत घोंगडे, सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी
गारगाई धरणाचे पाणी सरकारच्या फॉरेस्ट, वन्य जीव विभागाने अडवले; पालिकेकडून 2020 मध्येच प्रस्ताव मंजूर
बिहारमध्ये बचावकार्य करताना लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, पायलटच्या सतर्पतेमुळे मोठा अनर्थ टळला
नवरात्रोत्सवात महालक्ष्मी, भायखळा येथून बेस्टच्या विशेष गाडय़ा
KBC 16 : अखेर अमिताभ बच्चन यांच्या ओठावर ती गोष्ट आलीच; बिग बी म्हणाले, ती इच्छा अपुरीच राहिली…