भाजपने वन नेशन वन इलेक्शनबद्दल बोलणं हा तर जोकच, आदित्य ठाकरे यांची बोचरी टीका

भाजपने वन नेशन वन इलेक्शनबद्दल बोलणं हा तर जोकच, आदित्य ठाकरे यांची बोचरी टीका

One Nation One Election च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला फटकारले आहे. ”जी भाजपचा महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊ शकत नाही, चार राज्यात निवडणूका घेऊ शकत नाही त्यांनी वन नेशन वन इलेक्शनबद्दल बोलणं हा तर जोकच आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

”हे इलेक्शन कमिशन लवकरच कपिल शर्मा शो चालवणार आहे. कारण ते एका बाजूला जम्मू कश्मीर व हरयाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाही असं सांगतात. जम्मू कश्मीरमध्ये टप्प्याटप्प्यात निवडणूक घेत आहेत. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकाच्या निवडणूका झालेल्या नाहीत आणि हे वन नेशन वन इलेक्शनचं बोलत आहेत. जी भाजपचा महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊ शकत नाही, चार राज्यात निवडणूका घेऊ शकत नाही त्यांनी वन नेशन वन इलेक्शनबद्दल बोलणं हा तर जोकच आहे. हे सर्व काय कसं होणार याबाबत कुठेही स्पष्टता नाही. भाजपला निवडणूका घ्यायची हिंमतच नाही. कारण भाजपला हे 100 टक्के माहित आहे की ते सर्व निवडणूका हरणार आहेत. हरायचं नाही म्हणून निवडणूका घ्यायच्या नाही. हे लोकशाहीला व संविधानाला हानीकारक आहे” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोविंदावर गोळी चुकून फायर झाली की कोणी झाडली? पोलिसांनी काय दिली माहिती गोविंदावर गोळी चुकून फायर झाली की कोणी झाडली? पोलिसांनी काय दिली माहिती
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची प्रकृती आता ठीक आहे. मुलगी टीनाने वडिलांबाबत अपडेट दिली आहे. ती म्हणाली की, ते आता पूर्णपणे...
वोट जिहादची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे, नाना पटोलेंची टीका
दापोलीत जैन समाजाने बनवलेल्या व्हिडीओतून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, शिवप्रेमींनी निर्मात्यांच्या काळं फासलं
नागपूर हादरले, सेवानिवृत्त शिक्षकाने कुटुंबासह जीवन संपवले; कारण अनभिज्ञ
इराणच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पंतप्रधान नेतान्याहू बंकरकडे धावले? जाणून घ्या काय आहे सत्य
Ratnagiri News – दापोलीमधील पिसई प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायाकल्प पुरस्कारात जिल्हात चौथा क्रमांक
ICC कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराह अव्वल, यशस्वीची गरुड झेप; ‘या’ खेळाडूंना बसला फटका