Kolhapur accident – निपाणी-देवगड राज्य महामार्गावर ट्रक आणि बोलेरोची भीषण धडक; 3 तरुण जागीच ठार, 4 जखमी

Kolhapur accident – निपाणी-देवगड राज्य महामार्गावर ट्रक आणि बोलेरोची भीषण धडक; 3 तरुण जागीच ठार, 4 जखमी

निपाणी-देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी परिसरात ट्रक आणि बोलेरो गाडीच्या झालेल्या भीषण धडकेत बोलेरोतील तीन तरुण जागीच ठार झाले. तर‌ चार जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकसह घटनास्थळावरून पसार झालेला ट्रकचालक इस्पर्ली पोलीस चौकीत हजर झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली.

या भीषण अपघातात सोळांकुर,ता.राधानगरी गावातील शुभम चंद्रकांत धावरे (वय – 28), आकाश आनंदा परीट (वय – 23) आणि रोहन संभाजी लोहार (वय – 24) या तीन युवकांचा मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ऐन गणेशोत्सवात या अपघातामुळे एकाच गावातील तिघा जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

घटनास्थळ तसेच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वळणावर ट्रक (केए -28-एए- 8206) ने बोलेरो (एम.एच. 42-एच- 3064) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या धडकेत शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार हे जागीच ठार झाले. तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर राजेंद्र मनोहर लोहार (वय – 41, रा. सोळांकुर) यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली. अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.सुरवातीस अज्ञात ट्रक चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.पण नंतर पुढे अपघात करणारा ट्रकचालक ट्रकसह इस्पुर्ली पोलीस चौकीत स्वतः हजर झाला असून त्याच्यावर बेदरकारपणे वाहन चालवू तिघांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याचा व चौघांना जखमी केल्याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत होता.

कुटुंबीयांचा हंबरडा मन हेलावणारा

सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना सोळांकूर गावात मात्र शोककळा पसरली. मध्यरात्री अपघातस्थळी पडलेला रक्ताचा सडा आणि मृतदेहांची झालेली छिन्नविचिन्ह अवस्था पाहून अनेक गावकरी हेलावले. शवविच्छेदनानंतर सकाळीच तीनही मृतदेह गावात आणल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा मन हेलावणारा होता. सोळांकूर गावात ऐन गणेशोत्सव काळात स्मशान शांतता पाहायला मिळत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही – हायकोर्टचा इशारा Akshay Shinde Encounter : चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही – हायकोर्टचा इशारा
बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र या एन्काऊंटरवर...
Akshay Shinde Encounter : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या?; कोर्टात वकिलाचा मोठा युक्तिवाद काय?
Akshay Shinde Encounter: हे एन्काऊंटर होऊच शकत नाही, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
Akshay Shinde Encounter Hearing : तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारी वकिलांना घेतलं फैलावर
कधी कधी काही शिक्षा वेगळ्या पद्धतीने होतात…पंकजा मुंडेंनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रथमच केले भाष्य
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरआधी अक्षयने आईवडिलांकडे 500 रुपये मागितले, देहबोली कशी होती? बोलणं काय झालं?; वकिलाचा मोठा युक्तिवाद काय?
Sharmila Thackeray : अक्षय शिंदे कोणी संत नाही, असे एन्काऊंटर झाले पाहिजेत, शर्मिला ठाकरेंची रोखठोक भूमिका