रस्त्यावरील अपघात टाळण्याचे प्रयत्न वाया गेले, अखेर गडकरीसुद्धा निराश झाले

रस्त्यावरील अपघात टाळण्याचे प्रयत्न वाया गेले, अखेर गडकरीसुद्धा निराश झाले

देशभरात एकापाठोपाठ एक भीषण अपघात होत असताना आणि सत्ताधाऱयांकडूनच रस्ते सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात असताना आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही या प्रकरणी प्रचंड निराशा व्यक्त केली आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्याचे सर्व प्रयत्न वाया गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रस्ते अपघात करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु त्यात फारसे यश येत नसल्याची कबुलीच नितीन गडकरी यांनी एक दिवस आधीच दिली आहे. त्यानंतर आजही त्यांनी रस्ते अपघातांमध्ये वाढ झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जगभरात होणाऱया रस्ते अपघातात हिंदुस्थान आघाडीवर असून सर्वाधिक अपघाती मृत्यू होण्यातही हिंदुस्थान सर्वात पुढे आहे. आम्ही आमच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत असलो तरी आम्हाला त्यात तितके यश मिळत नसल्याचे गडकरी म्हणाले. गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानी ऑटोमोबाईल उद्योग अतिशय वेगाने पुढे सरकत आहे. असे असले तरी रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करायला हवा. तसेच वाहनचालक आणि पादचाऱयांसाठी रस्ते सुरक्षित बनवणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले. नवी दिल्लीत सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमाबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या वार्षिक संमेलनात गडकरी बोलत होते.

वाहनाच्या सुरक्षेसाठी आदर्श 5 स्टार सुरक्षा रेटिंग

भारत एनसीएपी किंवा न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अंतर्गत देशातील बाजारपेठेत विकण्यात येणाऱया वाहनांसाठी देशाकडे स्वतःची व्रॅश सेफ्टी रेटिंग आहे. त्यानुसार वाहन व्रॅश-सेप्टी चाचणीत उत्तम ठरले तर आदर्श 5 स्टार रेटिंग प्रदान करण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले.

देशात दर तासाला 53 अपघात, 19 मृत्यू

देशात दर तासाला जवळपास 53 रस्ते अपघात घडतात आणि 19 जणांचा मृत्यू होतो. यात 45 टक्के अपघात दुचाकाRमुळे तर 20 टक्के अपघात पादचाऱयांमुळे होतात, असेही गडकरी यांनी सांगितले. वाहनचालकांना उत्तम प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने वाहन चालक प्रशिक्षण स्पूल सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अक्षयने आधी शिवी दिली, मग हवालदार तावडेंच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या…एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी सांगितले नेमके काय घडले? अक्षयने आधी शिवी दिली, मग हवालदार तावडेंच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या…एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी सांगितले नेमके काय घडले?
बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर सोमवारी करण्यात आले. त्यानंतर राज्यात सत्ताधारी अन् विरोधक समोरासमोर आले...
रॅम्प वॉकदरम्यान ऐश्वर्या रायसोबत घडलं असं काही..; अभिनेत्रीच्या आत्मविश्वासाचं होतंय कौतुक
हिंमतसुद्धा करू नका..; तिरुपती लड्डू वादाची खिल्ली उडवणाऱ्या अभिनेत्यावर भडकले पवन कल्याण
वीज कर्मचारी आज, उद्या संपावर जाणार
परतीच्या पावसाने नगर जिल्हय़ाला झोडपले! नगर, पारनेर, राहुरी तालुक्यांत पाऊस; सरासरी 129 मि.मी. पावसाची नोंद
सहकारी संस्था संपवण्याचे घातक राजकारण खेळले जात आहे, शरद पवार यांची टीका
पश्चिम रेल्वेत 5066 शिकाऊ पदांसाठी भरती