जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले; गोदापात्रात साडेनऊ हजार क्युसेक्सचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले; गोदापात्रात साडेनऊ हजार क्युसेक्सचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

>> बद्रीनाथ खंडागळे

तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या गोदावरी नदीपात्रामध्ये 9 हजार 432 क्युसेक्स याप्रमाणे जलविसर्ग केला जात असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी माहिती दिली.

सोमवारी 9 सप्टेंबर रोजी 11, 12, 13, 14, 25 आणि 26 क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले. यातून 3 हजार 144 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढत असल्याने सोमवारी सायंकाळई जलविसर्गामध्ये वाढ करावी लागली. सायंकाळी आणखी 6 दरवाजे उघडून 7 हजार क्युसेक्सचा जलविसर्ग गोदापत्रात सुरू झाला.

मंगळवारीही पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढत राहिल्याने दुपारी साडे अकराच्या सुमारास आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले. प्रकल्पाच्या 27 पैकी 13, 224, 15, 22, 17 आणि 20 क्रमांकाचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. अशा प्रकारे 27 पैकी 18 दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये 9 हजार 432 क्सुसेक्सचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, विसर्ग वाढल्याने पैठण शहरासह तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पैठण शहर, पाटेगाव, कावसान, नायगाव, मायगाव, वडवाळी, वाघाडी, नवगाव, आगरनांदुर, आवडे उंचेगाव, चनकवाडी, टाकळी अंबड, हिरडपुरी व आपेगाव या पुरप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या 16 गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे.

या विसर्गामुळे गोदापात्रातील पाणीपातळी वाढणार असल्याने गोदावरी नदीकाठावर असलेल्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. काठावरील शेतात बांधलेले पशुधन सुरक्षित ठिकाणी न्यावे असे आवाहनही तहसीलदार सारंग चव्हाण यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अखेर घटस्फोटाबद्दल नेहा कक्कर हिच्या पतीकडून ‘तो’ मोठा खुलासा, रोहनप्रीत सिंहने थेट म्हटले… अखेर घटस्फोटाबद्दल नेहा कक्कर हिच्या पतीकडून ‘तो’ मोठा खुलासा, रोहनप्रीत सिंहने थेट म्हटले…
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांनी 2020 मध्ये लग्न केले. अत्यंत खासप्रकारे यांचे लग्न गुरुद्वारामध्ये झाले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो...
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पोलिसांच्या व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, पाहा Video
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला वेगळं वळण, हायकोर्टाने घेतली दखल
मुनव्वर फारुकी याने मुंबईत खरेदी केले नवीन घर, किंमत तब्बल इतके कोटी आणि…
Ind Vs Ban 2nd Test 2024 – BCCI चा मोठा निर्णय, टीम इंडियाचे हे 3 खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळणार नाहीत
अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर, 7 तास शवविच्छेदन; अहवालामध्ये मोठा खुलासा काय?
चोर समजून दोन अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल