सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास सकारात्मक – CM एकनाथ शिंदे

सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास सकारात्मक – CM एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या तक्रारी असतील. ज्यांनी जे घोटाळे केले असतील. शेतकऱ्यांशी दगाबाजी करण्याऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. शेतकरी आमचा अन्नदाता, मायबाप आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार उभे आहे. कायम उभे राहिल. अशा प्रकारच्या घटना खपवून घेतले जाणार नाही. सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे. आम्ही निर्णय घेतला मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. ते टिकवलं. काही लोकं याच्या विरोधात गेले आहेत. ते कोण आहेत याचा विचार मनोज जरांगे पाटील यांनी केला पाहिजे. आरक्षण रद्द व्हावे म्हणून कोण प्रयत्न करत आहे. जेव्हा आरक्षण देण्याची संधी होती तेव्हा आरक्षण दिले नाही. आता आरक्षण आम्ही दिले तर ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करतंय.

कुणबी नोंदी प्रमाणपत्र देण्याचं काम शिंदे समिती करत आहे. सगसोयरेच्या बाबतीत कार्यवाही आणि आक्षेप तपासले जात आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास सकारात्मक आहे. कुठलाही इतर समाजचे,ओबीसीचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे.

‘मी गल्ली मधला मुख्यमंत्री आहे. मी एक कार्यकर्ता आहे. किसन नगर हे माझं घर आहे. इथं आल्याने मला आनंद आहे. फक्त योजना आणायच्या घोषणा करायच्या आणि सोडून द्यायच्या असं नाही. या योजनेचे पैसे माझ्या बहिणींना मिळतोय की नाही व सिलेंडर बाबत फॉर्म भरले की नाही व इतर योजना बाबत देखील आम्ही सूचना करत आहोत. एका दिवसात मी स्वतः पंधरा घरात फिरतोय आमचे आमदार खासदार कार्यकर्ते व नेते प्रत्येक जण एका दिवसात 15 घर हा अभ्यान राबवतील.’

‘विरोधकांनी अपप्रचार केला तरीसुद्धा या महिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून फॉर्म भरला. विरोधकांच्या अपप्रचाराला आमच्या बहिणी बळी पडल्या नाही. भावावर विश्वास ठेवला आणि हा भाऊ जे बोलतो तेच करतो. आमची योजना कोण बंद पाडणार, सरकार आम्ही आहे आणि ही योजना बंद नाही होणार तर चालूच राहणार.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अखेर घटस्फोटाबद्दल नेहा कक्कर हिच्या पतीकडून ‘तो’ मोठा खुलासा, रोहनप्रीत सिंहने थेट म्हटले… अखेर घटस्फोटाबद्दल नेहा कक्कर हिच्या पतीकडून ‘तो’ मोठा खुलासा, रोहनप्रीत सिंहने थेट म्हटले…
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांनी 2020 मध्ये लग्न केले. अत्यंत खासप्रकारे यांचे लग्न गुरुद्वारामध्ये झाले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो...
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पोलिसांच्या व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, पाहा Video
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला वेगळं वळण, हायकोर्टाने घेतली दखल
मुनव्वर फारुकी याने मुंबईत खरेदी केले नवीन घर, किंमत तब्बल इतके कोटी आणि…
Ind Vs Ban 2nd Test 2024 – BCCI चा मोठा निर्णय, टीम इंडियाचे हे 3 खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळणार नाहीत
अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर, 7 तास शवविच्छेदन; अहवालामध्ये मोठा खुलासा काय?
चोर समजून दोन अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल