मीच शाहिदला मेसेज-कॉल करायची..; जेव्हा करीना कपूरने केला खुलासा
अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या एका जुन्या एपिसोडमध्ये करीना शाहिदविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. शाहिदसोबतची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, याविषयी करीनाने सांगितलं होतं.
शाहिदने मला भावच दिला नव्हता. मला जवळपास दोन महिने त्याच्या मागे लागावं लागलं होतं. मीच त्याला मेसेज आणि कॉल करायला सुरुवात केली होती. मीच त्याला भेटायला बोलवायची, कारण तो खूप लाजाळू होता", असं करीना म्हणाली होती.
करीनाच्या प्रयत्नांनंतर हळूहळू शाहिद तिच्याशी बोलू लागला होता. रिलेशनशिपसाठी पहिलं पाऊल करीनानेच उचललं होतं. हे दोघं जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2004 मध्ये ‘फिदा’ या चित्रपटाच्या सेटवर करीना शाहिदला पहिल्यांदा भेटली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List