फडणवीस गृहमंत्री आहेत, तोवर…; नागपुरातील हिट अँड प्रकरणावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप

फडणवीस गृहमंत्री आहेत, तोवर…; नागपुरातील हिट अँड प्रकरणावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप

नागपूर शहरात रविवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत ऑडी कार चालकाने एका दुचाकीसह काही वाहनांना धडक दिली. या हिट अँड रन केसमधील कार ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याची असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. बावनकुळेंनीही ते मान्य केलं आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी भाजपला घेरलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, असं राऊत म्हणालेत.

फडणवीसांवर निशाणा

कोण कुठल्या पार्टीचा आहे, त्याच्याशी आम्हाला मतलब नाही. शहजादे नशेमध्ये होते. त्यांना वाचवत आहेत. कोणत्या दुसऱ्या पार्टीचा नेत्याचा मुलगा असला तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या फौजेने आमच्यावरती किती तरी हल्ले केले असते. देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्रिपदावरती बसण्याचे लायक नाहीत. जोपर्यंत फडणवीस त्या पदावरती आहेत त्या आरोपीचे चौकशी होणार नाही रश्मी शुक्ला जोपर्यंत डीजी पदावर आहे तोपर्यंत चौकशी होणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

नागपूर हिट अँड प्रकरणावर राऊत काय म्हणाले?

पोलीस यंत्रणा देवेंद्र फडणवीसांच्या कोठ्यावर नाचत आहे. नाचवले जात आहे. विकत घेतले जात आहे एफआयआरमध्ये संकेत बावनकुळेचं नाव देखील नाही . लाहोरी बारचे cctv काढा… कोण दारू पिऊन नशेत होते. चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा विषय नाही आहे. या राज्यातल्या कायदा असं व्यवस्थेचा जो कचरा झालेला आहे कायदा दोन आहेत का? एका बाजूला नरेंद्र मोदी सामान कायद्याच्या गोष्टी करतात. कायदा सर्वांसाठी सारखा आहे, म्हणतात पण या राज्यात तसे नाही आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

नागपुरातील हिट अँड प्रकरणात दुर्दैवाने विरोधी पक्षाला मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या फौजा आहेत, त्या आमच्यावर तुटून पडल्या असत्या. चार जखमी आहेत दोन गंभीर जखमी आहेत लाहोरी बारमध्ये… दोन वेळा झालं सीसीटीव्ही फुटेज नेहमीप्रमाणे गायब आहे. नंबर प्लेट गाडीची काढून टाकली. ड्रायव्हरचे अदलाबदली झाली शाहजादे, युवराज हे गाडी चालवत होते… एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय…हे कोणत संविधान आहे? देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाहीत, असंही संजय राऊत म्हणालेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर, 7 तास शवविच्छेदन; अहवालामध्ये मोठा खुलासा काय? अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर, 7 तास शवविच्छेदन; अहवालामध्ये मोठा खुलासा काय?
बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय...
चोर समजून दोन अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
Video – पेन्शनसाठी 70 वर्षीय वृध्द महिलेची पायपीट, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ व्हायरल
हिंदी बिग बॉससाठी मराठी बिग बॉस लवकर संपणार? मराठी प्रेक्षक भडकले…
काहीही काम न करता वर्षाला कमावतोय 6 कोटी, तुम्हालाही आवडेल असं काम करायला? वाचा सविस्तर…
इस्रायलने हिजबुल्लाहच्या कंमाडरचा केला खात्मा, संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्ते केली चिंता
छत्री घेऊनच बाहेर पडा, पुढच्या पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा