कार्ड अपडेटच्या नावाखाली करायचे फसवणूक  

कार्ड अपडेटच्या नावाखाली करायचे फसवणूक  

बँकेचे कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली वृद्ध महिलेची 7 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेला वांद्रे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. अंजू जरीवाला असे तिचे नाव आहे. तिच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या वांद्रे परिसरात राहतात. त्यांनी काही रक्कम त्यांच्या मुलाच्या खात्यात ठेवली आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर एका नंबरवरून पह्न आला. पह्न करणाऱ्याने तो खासगी बँकेचा अधिकारी असल्याचे भासवले. कार्डच्या नावाखाली ठगाने त्यांच्या मुलाकडून बँकेचा तपशील घेतला. काही वेळाने त्याने मुलाचा मोबाईल तपासला असता, त्याच्या खात्यातून 7 लाख 25 हजार रुपये गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला.

वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांच्या पथकातील उप निरीक्षक शंकर पाटील आदी पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक गुजरात येथे गेले. पोलिसांनी सुरत येथे फिल्डिंग लावून अंजूच्या मुसक्या आवळल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजकारण सोडेन, पण उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार नाही राजकारण सोडेन, पण उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार नाही
उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भाजप आणि मिंधे गटाकडून माझ्या बदनामीचा...
नद्या आटल्या, जमीन सुकली, पाण्यासाठी वणवण; आफ्रिकेत वाढत्या तापमानाचा कहर
भाईंदरच्या नयानगरमधील गुन्हेगारीला बसणार चाप; 148 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर
अमेरिकेत विमानाचे गाव, गाड्यांऐवजी घरांसमोर विमाने
कर्जत-खालापूरमध्ये मिंध्यांच्या महेंद्र थोरवेंचा बॅण्ड वाजणार; अजित पवार गटाने केला उमेदवारीवर दावा
यंदा कर्तव्य आहे… 19 ऑक्टोबरपासून ‘लग्नाचा मुहूर्त’
उशीने तोंड दाबून मातेने चिमुकलीला संपवले; स्वतःही केली आत्महत्या