Yavatmal News – अवैध देशी दारू विक्रेत्यांविरुद्ध रणरागिणींचा एल्गार, दारू गुत्त्याची केली होळी

Yavatmal News – अवैध देशी दारू विक्रेत्यांविरुद्ध रणरागिणींचा एल्गार, दारू गुत्त्याची केली होळी

>>प्रसाद नायगावकर

वारंवार सूचना देऊनही पोलिसांना न जुमानता वनोजादेवी येथील बस थांब्याजवळ अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या दुकानाला गावातील महिलांनी आग लावली. यावेळी अवैध दारू विक्री करणारा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. यामुळे वणी तालुक्यातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी चौकीवर अवैध दारू विक्री सुरू असून, यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्री थांबविण्याची मागणी महिलांनी पोलिसांकडे केली होती. तरीही संबंधित मुजोर दारू विक्रेता विक्री करीत होता. चौकीवर अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याची माहिती मिळताच बहुसंख्येने असलेल्या महिलांनी त्याठिकाणी धाड टाकली. महिलांचा रौद्ररुप पाहून अवैध दारू विक्रेता चंद्रकांत सुधाकर भोसले (रा.नांदेपेरा) हा मुद्देमाल सोडून पळून गेला. देशी दारूचे 52 पव्वे आणि विदेशी दारूच्या सहा बॉटल जप्त करीत महिलांनी दारूच्या दुकानाला आग लावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

वणी तालुक्यात अवैध दारू विक्रीचे प्रमाण जास्तच वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वणी तालुक्यातील मंदर येथे अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी एल्गार पुकारत धाब्याला आग लावली. तसेच धाबा चालक व धाब्यातील एका सहकाऱ्याला चांगलाच धु धु धुतला यवतमाळ जिल्ह्यातील वणी-घुग्घुस रोडवर निलगिरी बन जवळ ही घटना घडली होती. प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संपूर्ण वणी तालुक्यात प्रशासनाविरुद्ध चांगलाच रोष आहे.

नेहमीप्रमाणे अशा घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येते . महिलांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आरोपी चंद्रकांत भोसले, त्याचा सहकारी उमेश हरिश्चंद्र चांदेकर (रा. मजरा) या दोघांना ताब्यात घेत दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तसेच देशी दारूचे 34 पव्वेही जप्त केले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात नव्याने पोलीस अधीक्षक म्हणून कुमार चिंता नुकतेच रुजू झाले आहेत. त्यांनी अशा प्रकारणांकडे जातीने लक्ष देऊन अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई कारवाई अशी मागणी या महिला वर्गाकडून होत आहे .

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत आजपासून पाच दिवस मुसळधार; मराठवाडा, विदर्भालाही झोडपणार मुंबईत आजपासून पाच दिवस मुसळधार; मराठवाडा, विदर्भालाही झोडपणार
गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा पारा चढला असून उन्हाचे चटके आणि उकाडय़ामुळे मुंबईकर प्रचंड हैराण आहेत. मात्र, उद्यापासून या उकाडय़ापासून दिलासा...
नांदेडात मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमार, पाच जण जखमी, दोघे रुग्णालयात
पराभवाची भीती, मिंध्यांनी पाडला घोषणांचा पाऊस
आज सिनेटसाठी मतदान! युवासेनेचे 10 शिलेदार निवडणुकीच्या मैदानात
आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुंब्रा बायपासवर थरार… पोलीस व्हॅनमध्ये बंदूक हिसकावून गोळीबार; पोलिसांच्या प्रत्युत्तरात शिंदे जागीच ठार
बेस्टच्या वाहक-चालकांना संरक्षण द्या, वडाळा आगारात कामगारांची निदर्शने
भरत राजाप्रमाणे चार महिने राज्यकारभार पाहणार, नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी स्वीकारला पदभार