Badlapur Sexual Assault : आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडली, प्रकृती गंभीर
बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ट्रान्झिट रिमांडमध्ये नेत असताना त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून स्वतःवर गोळी झाडल्याचे समजते. अक्षय शिंदे याची प्रकृती गंभीर आहे.
बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ट्रान्झिट रिमांडमध्ये नेत असताना त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून स्वतःवर गोळी झाडल्याचे समजते. अक्षय शिंदे याची प्रकृती गंभीर आहे.#BadlapurSexualAssault pic.twitter.com/iNE0CrZP28
— Saamana (@SaamanaOnline) September 23, 2024
आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा तुरुंगातून बदलापूरला नेत असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेतली. त्यानंतर त्याने त्या बंदुकीतून तीन राऊंड फायर केले. या गोळीबारात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला तर एका पोलीस देखील जखमी झाला आहे. निलेश मोरे असे त्या पोलिसाचे नाव असून या दोघांनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List