Ajit Pawar : गंमतीचा भाग जाऊ द्या, पण हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडू शकणार; अजितदादांनी मित्रांसह विरोधकांना करुन दिली आठवण, कोणता आहे तो विक्रम

Ajit Pawar : गंमतीचा भाग जाऊ द्या, पण हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडू शकणार; अजितदादांनी मित्रांसह विरोधकांना करुन दिली आठवण, कोणता आहे तो विक्रम

अजितदादा हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठीच नाही तर भूमिकेसाठी पण ओळखले जातात. बारामतीत येथे आज त्यांनी जनता दरबार भरवला. त्यांनी लोकांशी हितगुज साधले. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. विकास कामे करुन सुद्धा पराभव झाल्याचे दुःख त्यांनी जाहीर केले. त्याच दरम्यान त्यांनी विरोधकांसह मित्रांना त्यांच्या एका रेकॉर्डची आठवण करून दिली. अजितदादांचा हा रेकॉर्ड मोडणे सध्याच्या स्थितीत तरी कुणालाच शक्य नाही. पण हा रेकॉर्ड सांगताना त्याची दुसरी दुखरी बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे. कोणता आहे हा रेकॉर्ड?

पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री

महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो. इतरांच्या मुख्यमंत्री पदाचं काय मला माहीत नाही. पण पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची जी संधी मला मिळाली ती कुणाला मिळाली नाही. गंमतीने सांगायचं तर ते रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही, असे अजित पवार आज बारामतीत म्हटले. यापूर्वी पण त्यांनी या रेकॉर्डचा उल्लेख केला आहे.

दुखरी बाजू काय?

अजित पवार हे राज्याच्या राजकारणात 1991 पासून आहेत. कृषी, जलसंधारण, पाटबंधारे, ऊर्जा आणि नियोजन, जलसंपदा, अर्थ खाते अशा बड्या खात्यांचा कारभार त्यांनी लिलया हाकला आहे. त्यांच्याकडे प्रशासनाकडून काम करून घेण्याचा दांडगा अनुभव आहे. नियोजन आणि सुक्ष्म निरीक्षण या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. अनेक विभागाची आणि राज्याची खडान खडा माहिती आहे. पण इतके असून ही मुख्यमंत्री पदाने त्यांना सातत्याने हुलकावणी दिली आहे. एकवेळ तर राष्ट्रवादीच्या राज्यात अधिक जागा असताना पण काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचं आवतान दिल्याने त्यांची ही संधी पण हुकली.

या काळात होते उपमुख्यमंत्री

अजितदादा २०१० ते २०१२ या काळात उपमुख्यमंत्री पदी होते. त्यांच्याकडे वित्त, नियोजन आणि ऊर्जा खात्याचा कारभार होता. त्यानंतर २०१२ ते २०१४ या काळात उपमुख्यमंत्री पद चालून आले. पुढे २०१९ साली ते उपमुख्यमंत्री झाले. नाट्यमय घडामोडीनंतर हे सरकार टिकले नाही. त्यानंतर २०१९ ते २०२२ या काळात उपमुख्यमंत्री पदी राहिले. तर आता बंडाळीनंतर ते महायुतीत सहभागी झाले. तेव्हा त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री असते, रामदास आठवले यांनी थेट भावनेलाच घातला हात, रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न पूर्ण होणार का? …तर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री असते, रामदास आठवले यांनी थेट भावनेलाच घातला हात, रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न पूर्ण होणार का?
रिपब्लिकन ऐक्य हे तर समाजाचं स्वप्न आहे. विविध गटा तटात विखुरलेल्या नेत्यांनी एक मोट बांधून निवडणुकीला सामोरं जावं अशी समाजाची...
सत्यपाल मलिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला; भाजपवर घणाघाती टीका करत म्हणाले, सरकार तर…
शूटिंग सुरू असताना सेटवर अत्यंत मोठा अपघात, अभिनेत्रीचा जळाला चेहरा, अंकिता लोखंडे धावली मदतीला आणि पुढे…
दहा वर्ष लहान पतीसोबत अभिनेत्रीने केला रोमान्स, लिपलॉक करताना आई वडिलांना बघताच मुलीने थेट…
श्रद्धा कपूरच्या कुटुंबातील लोकप्रिय अभिनेत्री दिसणार सलमान खानच्या शोमध्ये? मोठी अपडेट समोर
अरविंद केजरीवाल दिल्लीतील मुख्यमंत्री निवास लवकरच सोडणार; केंद्राकडे निवासस्थानाची मागणी
राज्यातूनच नाही, तर देशभरातून भाजपचा सफाया निश्चित; सत्यपाल मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल