पवारांच्या डोक्यात काय आहे, हे जर फडणवीसांना कळालं असतं तर…; खोचक शब्दात संजय राऊतांची टीका

पवारांच्या डोक्यात काय आहे, हे जर फडणवीसांना कळालं असतं तर…; खोचक शब्दात संजय राऊतांची टीका

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात कुणाचं सरकार येणार? कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार? याबाबत चर्चा होत आहे. अशातच जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतची स्पष्टता असावी. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केलाय. ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री, असं म्हणत निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाबाबत ठरवू असं शरद पवार म्हणाले. त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात भाष्य केलं. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

शरद पवार यांच्या डोक्यात मुख्यमंत्रिपदासाठीची तीन नावं डोक्यात आहेत. ती मला माहिती आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांच्या डोक्यात काय आहे, हे जर देवेंद्र फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची ही अवस्था नसती, असं संजय राऊत म्हणालेत. देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का? हे त्यांना कोणी सांगितलं. पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात… पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना आधी कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती!, असा घणाघात राऊतांनी केलाय.

फडणवीसांच्या आयुष्याची, राजकारणाची आणि प्रतिष्ठेची घसरण झालेली आहे. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर वर्ष कळणार नाही. 2019 साली शरद पवारांच्या डोक्यात काय होतं हे त्यांना कळलं नाही, पण झाले ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री… हिंमत असेल तर 2024 ला वेळेत निवडणुका घ्या. मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येतंय. हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचं बंद होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

अमित शाहांवर टीकास्त्र

संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली आहे. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री असल्याने त्यांना मुंबईत येण्याची परवानगीची गरज नाही. लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येतायेत, येऊद्यात. पण मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग, अनेक संस्था त्यांनी गुजरातला पळवल्या त्याप्रमाणे ते एक दिवस लालबागचा राजा गुजरातला नेणार नाहीत ना… हेही होऊ शकतं. शाह काहीही करू शकतात, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘जगाला युद्ध नको बुद्ध हवाय’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ‘जगाला युद्ध नको बुद्ध हवाय’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
“जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय”, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
54 वा मजला… किंमत 123 कोटी रुपये…कोणी घेतला मुंबईत आलिशान अपार्टमेंट
थोडक्यात वाचला राहुल वैद्य, चेहऱ्यापर्यंत आगीचा लोळ, हैराण करणारा व्हिडीओ, अखेर सेटवर…
राजू श्रीवास्तव यांचे 5 भन्नाट डायलॉग, चाहते आजही विसरू शकले नाहीत
दहशतवाद्यांकडून विमान हायजॅक तरीही महिलेनं रोज केला मेकअप..; फ्लाइट इंजीनिअरकडून खुलासा
भर मंचावर ऐश्वर्या राय हिने केली ‘ही’ कृती, फक्त अमिताभ बच्चन आणि जया बच्चनच नाही तर चक्क…
राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीच्या भावना, ‘परदेशात आहेत पण लगेच घरी…’