Ganeshotsav 2024 – आम्ही चालवू हा पुढे वारसा! कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी…जाणून घ्या महत्त्व…

Ganeshotsav 2024 – आम्ही चालवू हा पुढे वारसा! कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी…जाणून घ्या महत्त्व…

>> योगेश जोशी
भाद्रपद महिना सुरू झाल्यावर पहिले व्रत असते, ते हरितालिका, त्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्थापनेचा दिवस, त्यामुळे सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत असतो. त्यानंतर भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमी असे म्हणतात. आता ऋषीपंचमी म्हणजे नेमके काय हा दिवस का आणि कसा साजरा करतात, असे प्रश्न उपस्थित होतात. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया…
लहानपणी आकाशात पंतगासारख्या आकारात असलेले सप्तर्षीची ओळख करून देण्यात येते. त्यामुळे आपल्याला ऋषी म्हणजे सप्तर्षी एवढे माहिती असते. मात्र, याच ऋषीमुनींनी सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची भंडारे उघडून दिली. स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास उलगडला. तसेच त्याकाळात जनतेला समजेल उमजेल अशा पद्धतीने ज्ञानदान करत समाजाची घडी बसवली. त्यांचे स्मरण करत आपल्याकडे पंरपरेचा समृद्ध वारसा आहे. आम्ही चालवू हा पुढे वारसा.. असे म्हणत या ऋषीमुनींपित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी.
जनतेपासून समजापासून दूर राहत जप, तप, ध्यान, ध्यारणा, संशोधन,चर्चा, वादसंवाद घडवत अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य ऋषींनी केले. त्यातून आपला समाज आणि संस्कृती विस्तारली.  समजाला योग्य मार्गदर्शन करत जीवन जगण्याची पद्धती सांगतिली. कोणत्याही धर्माचा प्रसार न करता ज्ञानाची कास धरून नीतीने जगणे म्हणजे मनवधर्म अशी शिकवण दिली. वसुधैव कटुंबम् म्हणजे जग हेच एक कुटुंब अशी शिकवण देत निसर्गाचे संगोपन करत मोलाचा  सांस्कृतिक वारसा दिला. त्या ऋषीमुनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच ऋषीपंचमी.
ऋषींचे प्रतीक म्हणजे आकाशगंगेत दिसणारे सप्तर्षी. ऋषींमध्ये  ब्रह्मर्षी, देवर्षी, महर्षी, परामर्षी, काण्डर्षि, श्रुतर्षि आणि  आणि राजर्षी असे सात प्रकारचे ऋषी असल्याचे सांगितले जाते. सप्तर्षीमध्ये वशिष्ठ, कश्यप, अत्रि, जमदग्नि,गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज यांच्या समावेश होते. या सप्तर्षीशिवाय वाल्मिकी, चरक, च्यवन, मार्कंडेय, कौशिक, पूलस्त्य, आंगिरस, भृगु, मनू, गर्ग, सांदीपनी, ऋषशृंग, दुर्वास, विभांडक, कर्दम, व्यास, कणव, कणाद, अगस्ति, भार्गव हे इतर ऋषी आहे.
पुर्वीच्या काळी या ऋषींकडे राहून अध्ययन करण्यात येत असे. हे ऋषी विविध शाखांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत असत. ज्या ऋषींच्या शाळेत शिक्षण घेतले तेच पुढे गोत्र म्हणू रुढ झाले अशी मान्यता आहे. तसेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यापैकी कोणत्या शाखेचे अध्ययन केले आहे. तसेच याच्या उपशाखा म्हणजे ज्योतिष, आयुर्वेद, पुराणे, उपनिषदे, श्रुती यापैकी प्राविण्य असलेली क्षेत्रे त्यावरूनही आडनावे, गोत्र, उपगोत्र, शाखा यांची विभागणी झाली. अशा प्रकारे समाजव्यवस्थेचा पाया आखण्यात आला. तसेच त्याकाळी जातीभेद किंवा जन्मावरून जात ठरत नसे. एखाद्या विद्येत, कलेत प्राविण्य प्राप्त करत ती जोपासण्याची मुभा होती.
ऋषी समजापासून दूर अरण्यात राहत असत. त्यामुळे शेती करणे, त्यातून धान्य मिळवत जेवण बनवणे असा प्रकार नव्हता. जंगलात जे सहज मिळेल, निसर्ग जे मुक्तहस्ते देईळ, त्याचा स्विकार करत आहार करत अध्ययन, अध्यापन करण्यात येई. त्याकाळी पहाटे चुलीवर मातीचे भांडे ठेवण्यात येई, त्यानंतर विद्यार्थी जंगलात जात ज्या मुळी, पाले भाज्या, फळे मिळतील ते आणून त्या मातीच्या भांड्यात टाकत. अशाप्रकारे मान्हान्यापर्यंत त्या मातीच्या भांड्यात जे शिजेल, त्याचा आहार करण्यात येई. याची माहिती व्हावी आणि सात्विक आहार म्हणजे काय, हे समजावे, यासाठी या दिवशी ऋषीची भाजी केली जाते.
स्वतः कष्टाने मिळवलेले किंवा निसर्गाने दिलेल्या वस्तूंचा स्विकार करत शिजवलेले अन्न किंवा भाजी म्हणजे ऋषीची भाजी. कालांतराने ही पद्धत विस्मृतीत गेली आणि बाजारात मिळणाऱ्या भाज्यांपासून ऋषीची भाजी बनवण्यात येऊ लागली. ऋषीपंचमी त्याचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणाऱ्या भाजीला ऋषीची भाजी का म्हणतात, याची माहिती आपण घेतली. त्यामुळे आपली संस्कृती आणि परंपरा जाणून घेत, हा पुढे नेण्याची काळाची गरज आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 सप्टेंबर ते शनिवार 28 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 सप्टेंबर ते शनिवार 28 सप्टेंबर 2024
>> नीलिमा प्रधान मेष – चर्चेत वाद वाढेल मेषेच्या षष्ठेशात बुध, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या शेवटी तणाव, चिंता जाणवेल. कायद्याला...
भाजप पक्ष खोट्या गोष्टी पसरवतोय! राहुल गांधींचा जोरदार पलटवार
महाराष्ट्रातील पीडब्ल्यूडीच्या कामगारांना मोठा दिलासा, हंगामी कामगारही दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टीचे हकदार
भाजपच्या गॅसवर शिजणार ईदची बिर्याणी; ईद, मोहरमला दोन सिलिंडर मोफत, अमित शहा यांची घोषणा
जबाबदारी राज्य सरकारकडे अन् शिव्या मी खातोय, मुंबई-पुणे, कल्याण-नगर रस्ते तीन महिन्यांत दुरुस्त करा; नितीन गडकरी यांचा राज्य सरकारला इशारा
आरक्षित सरकारी भूखंडांवरील बांधकामांवर हातोडा पडणार, हरित लवादाने घेतली कठोर भूमिका
श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती, बंगळुरूत तरुणीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले