गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या महिलेचा अपघाती मृत्यू, पत्नीचा मृतदेह पाहून पतीचाही हार्टअटॅकने अंत

गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या महिलेचा अपघाती मृत्यू, पत्नीचा मृतदेह पाहून पतीचाही हार्टअटॅकने अंत

गणेशोत्सवासाठी कोकणातील मालवण येथील गावी गेलेल्या जोडप्याचा करुण अंत झाला. या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उषा हडकर असे पत्नीचे तर विपीन हडकर असे पतीचे नाव आहे.

हडकर पती-पत्नी आपली दोन मुलं आणि आईसोबत गणेशोत्सवासाठी आपल्या मालवण येथील मसुरे गावात गेले होते. यावेळी घरातील सेप्टीक टँकचे झाकण साफ करताना उषा या टँकमध्ये पडल्या. काही वेळाने कामानिमित्त बाहेर गेलेले विपीन घरी आले तर उषा नव्हत्या. त्यांनी घरामध्ये सर्वत्र पाहिले पण उषा दिसल्या नाहीत. जवळच्या नातेवाईकांकडेही चौकशी केली. मात्र उषा तिथेही नव्हत्या.

याचदरम्यान विपीन यांचे लक्ष सेप्टीक टँकच्या तुटलेल्या झाकणाकडे गेले. त्यांनी टँकजवळ जाऊन पाहिले उषा यांचा मृतदेह त्यांना दिसला. पत्नीचा मृतदेह पाहताच विपीन यांना धक्का बसला आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात विपीन यांचा मृत्यू झाला.

विपीन यांच्या आईने माहिती दिल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. दोन्ही मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यानंतर अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आणण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Reel बनवण्याच्या नादात प्राण गमवावे लागले, दुचाकीवर व्हिडीओ बनवताना मित्रांचा मृत्यू Reel बनवण्याच्या नादात प्राण गमवावे लागले, दुचाकीवर व्हिडीओ बनवताना मित्रांचा मृत्यू
सोशल मीडियावर Reel बनवणाऱ्या तरुण तरुणींची संख्या लाखात आहे. व्हायरल होण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता धोकादायक पद्धतीने व्हिडीओ बनवून...
दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची कर्नाटकात पुनरावृत्ती, आधी हत्या केली; मग मृतदेहाचे 30 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विद्यापीठ सिनेट निवडणुक नेमकी काय असते? जाणून घ्या
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मुस्लिम लांगुलचालनाची दवाब मान्य नाही, शाब्दिक चकमक, पाहा Video
धारावीत ‘मशिदी’वरुन तणाव, नितेश राणे यांची टीका
डीपी जळाली की इंजिनियरला हजार रुपये द्यायचे, तीन पिढ्यांपासून वीज बिल भरत नाही! मोदींच्या मंत्र्याने दिली वीजचोरीची जाहीर कबुली
जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे