वेळ आली तर विरोधकांकडे बोट दाखवता, जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका; मराठा आरक्षणावर काय भूमिका?

वेळ आली तर विरोधकांकडे बोट दाखवता, जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका; मराठा आरक्षणावर काय भूमिका?

मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारने विरोधकांवर मोर्चा वळवल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येते आहे. मनोज जरांगे पाटील आणि इतर जण केवळ आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप टीव्ही9 मराठी कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरुन जयंत पाटील यांनी आता सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने वेळकाढूपणा केला आणि आता ते विरोधकांकडे बोट दाखवत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

सरकारने आम्हाला कल्पना दिली नाही

यापूर्वी सर्व पक्षीय बैठका सह्याद्रीवर झाल्या आहेत. त्यानंतर जरांगे यांचं आंदोलन झालं. जरांगे नवी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. घोषणा केली. मोठा आनंदी सोहळा झाला. आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जरांगेच्या सर्व मागण्या मान्य केल्या असतील. सरकारने जरांगेंना दिलेली आश्वासने काय आहेत हे आम्हाला अधिवेशनात सांगितलं नाही. आम्हाला बोलावून त्यांनी विरोधकांना कधी कल्पना दिली नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

सरकारने वेळकाढूपणा केला

सरकारने त्यांना जे आश्वासन दिले असतील तर ते पूर्ण करण्यासाठी सराकरने निर्णय घ्यावा. काय आश्वासन दिले ते आम्हाला माहीत नाही. सरकार त्यांचा आहे. त्यांनी निर्णय घ्या. तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आम्ही विरोध करणार नाही. तुम्ही प्रचंड वेळकाढूपणा केला आहे. निर्णय घेतला नाही. खेळवत राहिला आहात. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तुम्ही विरोधकांकडे का बोट दाखवता. तुम्ही निर्णय घ्या. आमची काय भूमिका आहे. या पेक्षा सरकारला काय करायचं आहे. सरकारने निर्णय घ्यावा. आम्ही सरकारमध्ये नाही. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. तुम्ही निर्णय घ्या, असे ते म्हणाले.

किती जण सोबत येणार?

वाक्य काय आहे. टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम. टप्प्यात यायच्या आधी बोलायचं नसतं. मग टप्प्यात येणार कसे लोकं. माझ्यावर पवारसाहेबांनी जबाबदारी दिली आहे. पक्ष वाढवण्याची. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मनं राखून पक्ष वाढवण्याचं काम करत आहोत. सर्व होते तेव्हा ४ खासदार होते. सर्व गेले ८ खासदार झाले. स्वच्छ पक्ष म्हणून आमच्या पक्षाकडे पाहत आहेत. पवारांबाबत जनतेला विश्वास आहे. हा माणूस राज्याच्या हिताचं काम करू शकतो. राज्याच्या हितासाठी हा माणूस काम केलं आहे. आमच्यापेक्षा वेगाने पवार काम करतात. त्यामुळे आम्ही मोठ्या ताकदीने पुढे येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पवार विरुद्ध पवार सामना पाहायला मिळेल का

बारामतीत आमच्या पक्षाकडून निर्णय झाला नाही. एकत्रित बसल्यावर निर्णय घेऊ. पवार साहेबांवर हा निर्णय सोडतो. ते जो निर्णय घेतील तो मान्य करू. राज्यात महाविकास आघाडीचं वातावरण आहे. राज्यातील जनता उद्धव ठाकरे, पवार आणि काँग्रेसला सरकार देण्यास आतूर आहे. लाडक्या बहिणींनाही आम्ही अधिक उत्तम देऊ. भारतातील कोणत्याही लाडक्या बहिणीला वाटेल आपण महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. अशी व्यवस्था आम्ही करू, असा चिमटा त्यांनी काढला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या? “मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या?
Varsha Gaikwad Appeal To Dharavi People : मुंबईतील धारावी परिसरात शनिवारी सकाळी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. धारावी परिसरात असलेल्या एका...
मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीचं विधानसभेशी कनेक्शन?; आदित्य ठाकरे यांचा आरोप काय?
मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा, पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल – राऊत
‘वंचित’ तिसऱ्या आघाडीत सामील होणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं
Dharavi Mosque : धारावी मशीद प्रकरण, मशिदीचे विश्वस्त आणि आंदोलकांची परस्पर भिन्न भूमिका, पुढे काय?
Dharavi Mosque : ‘आत यश देणं अल्लाहच्या हाती’, पोलीस स्टेशन बाहेर आल्यानंतर तो नेता काय म्हणाला?
आज कोणतीही कारवाई होणार नाही, आता घरी जा, धारावीतील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु