विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेमचेंझर ठरणार का? एकनाथ शिंदे स्पष्ट शब्दात म्हणाले…

विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेमचेंझर ठरणार का? एकनाथ शिंदे स्पष्ट शब्दात म्हणाले…

विरोधक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेलेत. आमच्या बहिणींना आम्ही एक आधार देत आहोत. पण यांच्या पोटात दुखू लागले आहे. किती खोडे घालायचे, माझ्या लाडक्या बहिणी या दुष्ट भावांना बरोबर जोडे मारतील. विरोधक या योजनेवर तुटून पडलेत, लाडकी बहीण योजनेचे फॉर्मपण भरतात आणि बॅनरही लावतात पण त्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावत नाही. विरोध करायचा आणि दुसरीकडे श्रेय घ्यायचं असं एकनाथ शिंदे म्हणाले.

अजित दादा फक्त एकाच योजनेबाबत नाहीतर इतरही योजनांबद्दल बोलत आहेत. विरोधकांना आता अडचण झाली आहे. लोकसभा निवडणुकीसारखं फेक नरेटिव्ह सेट करण्याचं त्यांचं स्वप्न धुळीला मिळालंय. जनता एकदा फसते पुन्हा पुन्हा फसत नाही. आम्हाला आरोपाला कामाने उत्तर देण्याची सवय आहे. या दोन वर्षांमध्ये राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी कामे आणि निर्णय झाले. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा कसा राहिल याचा विचार करायला हवा. पण मोठे-मोठे नेते रस्त्यावर येऊन जोडे मारो आंदोलन करत आहेत. राजकारण कुठल्या थराला गेलं आहे, ही आपली संस्कृती नाही. आपल्या महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. राजकारण करा पण कोणत्या थराला जायचं हे आपण ठरवलं पाहिजे सकाळी उठता बसता झोपेत आणि स्वप्नात उद्धव ठाकरेंना मीच दिसतो. सत्य परिस्थिती सरकार बदललं आहे हे मान्य केले पाहिजे. दोन सव्वादोन वर्षे काम करणारे सरकार काय अदृश्य नाही ना? असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

बदलापूरमधील चिमुकलींसोबत झालेली घटना दुर्देर्वी पण त्याचे राजकारण त्यापेक्षा जास्त दुर्दर्वी आहे. या घटनेमधील आरोपीला फाशी होईपर्यंत स्वस्त बसणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो. विशेष कोर्ट वकील जे सर्व काही लागेल त्यासाठी सरकार त्याच पाठपुरवठा करत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काँग्रेस शिष्टमंडळ तातडीने राजभवनावर, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात काय केला गंभीर आरोप काँग्रेस शिष्टमंडळ तातडीने राजभवनावर, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात काय केला गंभीर आरोप
काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप यावेळी...
हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठाला झटका, सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश
Nitesh Rane : धारावी मशीद प्रकरणावर नितेश राणेंच प्रक्षोभक वक्तव्य, ‘ही जी काय दादागिरी….’ Video
राजकारणात येणार का?; नाना पाटेकर यांचं उत्तर काय?; म्हणाले, मला पक्षातून काढून…
ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूरही नाही वाचवू शकल्या ‘या’ सुपरस्टारच्या लेकाचे करिअर, अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करूनही…
रिक्षावाल्याने रस्त्यावरच केले चुकीचे कृत्य, अभिनेत्री घाबरली, थेट रस्ताच…
Nagar News – विद्यार्थ्यांना दिले निकृष्ट दर्जाचे गणवेश; शाळांसाठी खर्च केलेल्या 1700 कोटींचे विवरण द्या, उच्च न्यायालयाचे आदेश