देवदर्शनाहून परतत असताना टायर फुटल्याने कार उलटली, अपघातात मुंबई पोलिसाचा मृत्यू
पंढरपूरहून देवदर्शन घेऊन घरी परतत असताना भरधाव कारचा टायर फुटून कार उलटली. या अपघातात मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला. तर सात महिन्यांच्या चिमुरड्यासह तीन जण जखमी झाले. महादेव अश्रुबा सोनावणे असे मयत हवालदाराचे नाव असून ते मुंबईतील नागपाडा परिसरात राहत होते.
महादेव सोनावणे हे पत्नी जनाबाई सोनावणे, मुलगी वर्षा दराडे आणि सात महिन्यांचा नातू दक्ष दराडे यांच्यासह गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूरला देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून सर्व सोनावणे मित्राकडे गेले. मित्राकडून रविवारी ते मुंबईला परतत होते. यादरम्यान रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पाचेगाव बुद्रुकजवळ त्यांच्या गाडीचा टायर फुटला आणि गाडी खड्ड्यात उलटली.
या अपघातात महादेव सोनावणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी, मुलगी आणि नातू जखमी झाले. सोनावणे यांचा मृतदेह सांगोला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List