IAF Helicopter Landing – हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, गुजरातमध्ये आपत्कालीन लँडिंग
हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे गुजरातच्या जामनगरमध्ये सोमवारी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती लोक होते याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र यात कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रेमसुख देलू यांनी दिली.
जामनगर हवाई दलाच्या स्थानकापासून सुमारे 22 किमी अंतरावर असलेल्या रंगमती धरणाजवळील चांगा गावाबाहेर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. रंगमती धरणाजवळ हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, असे देलू यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List